Bogus Seeds : "आता काय करू... कुठं उगवणा, कुठं पीकं वाढना ; बोगस बियाणे-खतांच्या ढीगभर तक्रारी

Kharif Season : जुलै महिन्याच्या अखेरीस राज्यातील अनेक भागात दमदार पावसाची सुरुवात झाली. मात्र, अजूनही मराठवाडतील अपेक्षित पाऊस पडला नाही. दुसरीकडे बोगस बियाणे आणि खतांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
Seed
SeedAgrowon
Published on
Updated on

Kharif Sowing : राज्यभरात आठवड्याभरापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, दुसरीकडे मराठवाड्यात पुरेसा पाऊस झाला नाही. अशा परिस्थिती ज्या भागात पेरण्या झालेल्या पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे बोगस बियाणे आणि रासायनिक खतांच्या संदर्भात सुमारे १३०० तक्रारी दाखल केल्या आहेत.

Seed
Monsoon Session LIVE : शेतकऱ्यांना किती दिवस लुबाडणार? बोगस बियाण्यांसदर्भात विरोधकांचा सरकारला प्रश्न

यंदा माॅन्सूनच्या पावसाने उशीर केला. त्यामुळे खरीप हंगामाच्या पेरण्या रखडल्या होत्या. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पेरण्या केल्या. परंतु त्यावेळी महाराष्ट्रात सोयाबीन आणि कापूस बियाणांचा तुटवडा जाणवू लागला. दर्जेदार कंपन्यांच्या बियाणांचा काळाबाजार सुरू झाला. प्रशासनाने काही ठिकाणी कारवाईही केल्या. परंतु बियाणांची मागणी वाढल्याने बाजारात गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगण या राज्यांतील कापूस आणि सोयाबीनच्या बोगस बियाणांची विक्री झाली.

Seed
पोलिसांची कारवाई; देवगाव फाटा येथे साडेसहा लाखांचे बोगस बियाणे जप्त

त्या बियाणांची शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. एक महिन्यानंतर बियाणे न उगवणे आणि पिकांची वाढ खुंटल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. यासंबंधित शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी करण्यात येत आहे. त्यानुसार पंचनामे देखील करण्यास सुरुवात झाली आहे. पुरवठा झालेल्या बियाणे आणि रासायनिक खतांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. ते बियाणे आणि खाते नमुने अप्रमाणित असल्यास कृषी निविष्ठा विक्रेते आणि कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात येत आहे. २७ जुलैपर्यंत  ३ हजार ७९१  तक्रारी दाखल झाल्या असून सर्वाधिक १३०० तक्रारी बोगस बियाण्यांच्या अाहेत. दोषींवर कारवाई होईलही, मात्र शेतकऱ्याच्या हातातून गेलेला खरीप हंगाम परत येणार नाही.



 

बोगस बियाणांसबंधित कायदा


राज्यभरात विविध बोगस बियाणे, रासयानिक खते आणि लिंकेजच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. राज्यात भरातून कृषी विभागाच्या  व्हॉट्सअॅप क्रमांकावर ३ हजार ७९१ तक्रारी दाखल झाल्याचे आहेत. त्या संबंधित जिल्ह्यातील भरारी पथकांना तात्काळ सदर ठिकाणी तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बोगस बियाणे, खते आणि किटकनाशकांसबंधित कायदा करण्यात येणार आहे, अशी घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.

शेतकऱ्यांनी तक्रार कशी करायची ?

खत - बियाणे विक्री करणारी केंद्रे विशिष्ट कंपनीचे खत किंवा बियाणे खरेदी करण्याची सक्ती करत असतील, चढ्या भावाने विक्री होत असेल, तसेच बियाणे, खते, कीटकनाशके आदींच्या खरेदीबाबत शेतकरी बांधवांची काही तक्रार असेल तर ती 9822446655 या व्हाट्सऍप क्रमांकावर उपलब्ध असलेल्या पुराव्यासह पाठवावी; त्यावर शहानिशा करून तात्काळ कारवाई करण्यात येईल, तसेच तक्रार देणाऱ्या शेतकरी बंधू-भगिनींचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com