Orchard Update : अकोला जिल्ह्याला रोहयोतून १२०० हेक्टर फळबाग लक्षांक

MGNREGA : यंदाच्या मोसमात जिल्ह्यात सुमारे १२०० हेक्टर क्षेत्रावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीचा भौतिक लक्षांक घेण्यात आला आहे.
Orchard
Orchard Agrowon
Published on
Updated on

Akola News : पारंपरिक पिकांसोबत फळबागेकडे शेतकऱ्यांनी वळावे यादृष्टीने प्रोत्साहन दिले जात आहे. यंदाच्या मोसमात जिल्ह्यात सुमारे १२०० हेक्टर क्षेत्रावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीचा भौतिक लक्षांक घेण्यात आला आहे. कृषी आयुक्तालयाने हे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे.

या रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात आंबा, संत्रा, कागदी लिंबू, चिकू, सीताफळ, पेरू, डाळिंब, आवळा, चिंच, बोर, जांभूळ, कवठ, फणस, कोकम, ड्रॅगनफ्रुट, अव्हॅकेडो, केळी, फुलपिकांमध्ये निशिगंध, मोगरा, गुलाब, सोनचाफा तसेच फलोत्पादन पिकांव्यतिरीक्त बांबू, शेवगा, साग, शिंदी, औषधी वनस्पती या पिकांचीही लागवड करता येणार आहे.

Orchard
MGNREGA Labor : नगर जिल्ह्यात रोहयोवर १७ हजार १४६ मजूर

या रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात आंबा, संत्रा, कागदी लिंबू, चिकू, सीताफळ, पेरू, डाळिंब, आवळा, चिंच, बोर, जांभूळ, कवठ, फणस, कोकम, ड्रॅगनफ्रुट, अव्हॅकेडो, केळी, फुलपिकांमध्ये निशिगंध, मोगरा, गुलाब, सोनचाफा तसेच फलोत्पादन पिकांव्यतिरीक्त बांबू, शेवगा, साग, शिंदी, औषधी वनस्पती या पिकांचीही लागवड करता येणार आहे.

या पिकांचे कमाल दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत मापदंडानुसार अनुदान दिले जाईल. खड्डे खोदणे, कलमे-रोपे लागवड, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे आदी शासन अनुदानित कामांवर १०० टक्के अनुदान देय आहे. हेक्टरी कमाल अनुदान मर्यादेनुसार रक्कम लाभार्थ्यास ३ वर्षांच्या कालावधीत पहिल्या वर्षी ५० टक्के, दुसऱ्या वर्षी ३० आणि शेवटच्यावर्षी २० टक्के दिली जाईल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जुलै २०२४ अखेरपर्यंत संबंधित ग्रामपंचायत, गावच्या कृषी सहायकाकडे संपूर्ण कागदपत्रांसह अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

Orchard
Orchard Plantation : अशी करा फळबाग लागवडीची पूर्वतयारी

भाऊसाहेब फुंडकर योजनेसाठी दोन कोटी १० लाख

जिल्ह्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यासाठी दोन कोटी १० लाख ७४ हजार रुपयांचा आर्थिक लक्षांक देण्यात आला आहे. यामध्ये सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांसाठी एक कोटी ९४ लाख तर अनुसूचित जाती प्रवर्गाच्या लाभार्थ्यांसाठी १५ लाख ३३ हजार व अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी ६१ हजार रुपयांचा आर्थिक लक्षांक कृषी आयुक्तालयाने दिला आहे.

योजनेतून आंबा, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, चिकू, सीताफळ, पेरू, आवळा, चिंच, जांभूळ, फणस या फळपिकांचे किमान ०.२० हेक्टर, तर कमाल ६ हेक्टर क्षेत्रापर्यंत लाभ मिळू शकेल. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून महाडीबीटी प्रणालीवर आलेल्या अर्जानुसार सोडतीद्वारे लाभार्थ्यांची निवड केली जाईल. इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फळबागेच्या माध्यमातून चांगले उत्पन्न कमावता येते हे जिल्ह्यातील अनेक शेतकरी अनुभवत आहेत. रोजगार हमी योजना, भाऊसाहेब फुंडकर योजनेतून फळबागेसाठी अनुदानाचाही लाभ मिळू शकतो. यासाठी तातडीने अर्ज दाखल करावेत.
शंकर किरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com