Orchard Plantation : अशी करा फळबाग लागवडीची पूर्वतयारी

Team Agrowon

पूर्वतयारी आणि योग्य नियोजन महत्त्वाचे

फळबाग लागवड यशस्वी होण्यासाठी लागवडीची पूर्वतयारी आणि योग्य नियोजन अत्यंत महत्त्वाचे असते. तसेच फळझाडांची लागवड करण्याआधी योग्य पूर्वतयारी करून घ्यावी.

जागेची निवड

उत्तम निचरा, मध्यम खोलीची जमीन फळबाग लागवडीसाठी निवडावी.

Orchard Plantation | Agrowon

हवामान

फळबागेसाठी विशिष्ट प्रकारचे हवामान आवश्यक असते. चिकू, आंबा, केळी या फळपिकांना तुलनेने जास्त उष्ण हवामान मानवते.

Orchard Plantation | Agrowon

जमीन

लागवडीपूर्वी माती परिक्षण अवश्य करावे. फळझाडांची कलमे अनेक प्रकारच्या जमिनीत येऊ शकतात. तथापि, मध्यम प्रतीची, पोयटायुक्त, पाण्याचा निचरा होणारी जमीन योग्य असते.

Orchard Plantation | Agrowon

पूर्वमशागत

निवडलेल्या जमिनीची उन्हाळी खोल नांगरट करून कुळवाच्या २ ते ३ पाळ्या द्याव्यात. त्यानंतर जमीन समपातळीत आणून योग्य अंतरावर खड्डे खोदण्यासाठी बागेची आखणी करावी.

Orchard Plantation | Agrowon

लागवड पद्धती

फळबाग लागवडीसाठी चौरस, आयताकृती पद्धत तर डोंगर उतारासाठी कंटूर पद्धत वापरली जाते.

Orchard Plantation | Agrowon

खड्डा भरताना घ्यावयाची काळजी

खड्डा भरताना खड्ड्याच्या बुडाला अर्धवट कुजलेला पालापाचोळा पसरून खड्ड्याच्या आकारमानानुसार ४ ते ५ घमेली चांगले कुजलेले शेणखत टाकावे. सा

Orchard Plantation | Agrowon

कलमांची निवड

फळझाडांची कलमे, रोपांच्या निवडीवर फळांची गुणवत्ता आणि फळबागेचे एकूण यश अवलंबून असते. म्हणून फळबागेकरिता उत्कृष्ट आणि गुणवत्ता माहिती असलेली दर्जेदार आणि खात्रीशीर कलमे रोपे आणावी.

Orchard Plantation | Agrowon