
Shimla News : हिमाचल प्रदेशमधील बहुतांश भागात पाऊस हजेरी लावत असून प्रामुख्याने पालमपूर येथे गुरुवारीही (ता. २४) पावसाची नोंद झाली. बुधवार सायंकाळपासून ते गुरुवारपर्यंत १३७ मिमी पावसाची नोंद झाली. नहान येथे ९३ मिमी, सिमला येथे ७९ मिमी, धर्मशाला येथे ७० मिमी आणि मंडी येथे ५७ मिमी पावसाची नोंद झाली.
ऑगस्टमध्ये पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांत १२० जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण २३८ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण अद्याप बेपत्ता आहेत. याशिवाय राज्यभरातील ७०९ रस्ते बंद आहेत.
सिमल्यात आतापर्यंत २०१७ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. या पावसाने १२२ वर्षांचा विक्रम मोडला गेला आहे. मंडी, सिमला आणि सोलन येथे गेल्या चोवीस तासांत चार ठिकाणी ढगफुटी झाली. एकाच दिवसांत ११ जणांचा मृत्यू झाला असून १८ वाहनांची हानी झाली. सिमल्यातील वाहतूक सुरक्षितेसाठी बंद केली आहे. मुख्यमंत्र्यांकडून चोवीस तास लक्ष ठेवले जात आहे.
हिमाचल प्रदेशाने यंदाच्या मॉन्सूनमध्ये दोन महिन्यांत तीन दिवस विक्रमी पावसाचा अनुभव घेतला. पहिला पाऊस ९ आणि १० जुलै रोजी मंडी आणि कुलू जिल्ह्यात पडला. सिमला आणि सोलन जिल्ह्यात १४ आणि १५ ऑगस्टला पावसाने विक्रमी हजेरी लावली. सिमला शहराने मंगळवारी (ता. २२) रात्री मुसळधार पावसाचा मारा सहन केला.
शहरात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आणि भूस्खलनाचे प्रकार घडले. या तिन्ही पावसाने हिमाचल प्रदेशची मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी बुधवारी (ता. २३) सांगितले, की आतापर्यंत राज्य सरकारने १६५.२२ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. यातील काही पैसा पूल, रस्ते आणि घराच्या डागडुजीसाठी वापरला जात आहे. या पावसामुळे १० हजार कोटींचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.