Pune Village Development: पुणे रिंग रोडजवळील ११७ गावांचा होणार विकास

MSRDC Project: पुणे शहरानजीक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) १३७ किमी लांबीचा पुणे रिंग रोड प्रकल्प हाती घेतला आहे.
Pune Ring Road Plan
Pune Ring Road PlanAgrowon
Published on
Updated on

Pune News: पुणे शहरानजीक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) १३७ किमी लांबीचा पुणे रिंग रोड प्रकल्प हाती घेतला आहे. राज्य शासनानेया रिंगरोडलगतच्या पाच तालुक्यांतील ११७ गावांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून ‘एमएसआरडीसी’ची नियुक्ती केली आहे. त्यानुसार आता ११७ गावांचा विकास आराखडा करण्याचा इरादा प्रसिद्ध केला असून, येत्या आठ महिन्यांत हा विकास आराखडा (डीपी) तयार करण्यात येणार आहे.

रिंगरोडसाठी आवश्यक असलेल्या जागेचे संपादन करण्यात येत आहे. या रिंगरोडलगत दोन विकास केंद्रे प्रस्तावित असून ते ‘एमएसआरडीसी'कडून विकसित करण्याचा इरादा आहे. सुमारे ६६८ चौ. किमी क्षेत्रासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून ‘एमएसआरडीसी’ काम पाहणार आहे.

Pune Ring Road Plan
Pune Ring Road : रिंग रोडच्या पश्चिम मार्गावरील ६४४ हेक्टर जमिनीचे संपादन

रिंगरोड प्रकल्पाच्या विकासाशी संबंधित खर्चाची भरपाई विचारात घेता भूसंपादनासाठी लागणारा निधी उभारण्यासठी विविध मॉडेल्सचा वापर करून या प्रदेशातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यटन सुलभ करण्यासह या गावातील बांधकाम परवानगीचे अधिकारही ‘एमएसआरडीसी’कडे असतील.

या गावांचा होणार विकास आराखडा :

हवेली : गोगलवाडी, माळखेड, मांडवी खुर्द, मांडवी बुद्रुक, खडकवाडी, माणेरवाडी, खानापूर, थोपटेवाडी, गोरे खुर्द, गोरे बुद्रुक, आगळंबे, जांभळी, भगतवाडी, घेरा सिंहगड, डोणजे, वांजळेवाडी, खाडेवाडी, बहुली, सोनापूर, वरदाडे, संभारेवाडी, खामगाव मावळ, मोगरवाडी, कुडजे, मोकरवाडी.

Pune Ring Road Plan
Pune Ring Road : पुणे रिंगरोडच्या भूसंपादनास गती; ८ हजार शेतकर्‍यांची सहमती

भोर : भांबवडे, भोंगवली, धनगवाडी, गुणंद, केंजळ, खडकी, मोरवाडी, न्हावी, निगडे, पांदे, पांजळवाडी, राजापूर, सांगवी खुर्द, सारोळे, सवर्डर, तपरेवाडी, उंबरे, वाठार खुर्द, वाघजवाडी, देगाव, दिडघर, जांभळी, कंबारे, कंजाळे, करांदी, केटकवणे, खोपे, कोळवाडी, कुरुंगवाडी, कुसगाव, माळेगाव, पर्वडी, रांजे, सालवडे, सांगवी बुद्रुक, सोनवाडी, विरवाडी.

पुरंदर : कोडित खुर्द, पूर, पोखर, वारवाडी, कुंभोशी, सोमुडर्डी, घेरापुरंदर, सुपे खुर्द, मिसळवाडी, थापेवाडी, भिवरी, भिवडी, बहीरवाडी, भोपगाव, पाथरवाडी, पिंपळे, पानवडी, हिवरे, कोडित बुद्रुक, अस्करवाडी, चांबळी, बोरहळेवाडी, गारडे.

मुळशी : मुठा, बोतरवाडी, आंदगाव, खारावडे, साईव खुर्द, काटवडी, डावजे, माळेगाव, वाजले, वातुंडे, जातेडे, चिंचवड, कोंदूर, चिखली बुद्रुक, बेलावडे, दरवळी, भरेकरवाडी, मोरेवाडी, विठ्ठलवाडी, टेमघर, खेचरे, मारणेवाडी, कोंढवले.

वेल्हे : वरसगाव, कुरण बुद्रुक, मोसे बुद्रुक, साईव बुद्रुक, ओसाडे, निगडे मोसे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com