Shelgaon Barrage : शेळगाव बॅरेजला वन विभागाची ११.५९ एकर जमीन

Jalgaon Forest Department : वनविभागाची ११.९५ एकर जमीन शेळगाव बॅरेजला मिळवून दिली आहे. त्याबाबत नागपूर वन विभागाने जळगाव वन विभागाची जमीन देण्यास मंजुरी दिली आहे.
Shelgaon Barrage
Shelgaon Barrage Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : शेळगाव (ता.जळगाव) येथील सिंचन प्रकल्पात वन विभागाच्या जमिनीचा अडसर येत होता. ती जमीन वन विभागाकडून प्रकल्पाला मिळविण्यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना यश आले आहे.

अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सातत्याने पाठपुरावा करीत वनविभागाची ११.९५ एकर जमीन शेळगाव बॅरेजला मिळवून दिली आहे. त्याबाबत नागपूर वन विभागाने जळगाव वन विभागाची जमीन देण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे शेळगाव बॅरेजला ९ हजार १२८ हेक्टर क्षेत्रावर सिंचनाची सोय होईल.

Shelgaon Barrage
Agriculture Irrigation : उपळाईच्या शेतकऱ्यांचा पाण्यासाठी ‘रास्ता रोको’

याचा फायदा जळगावसह यावल तालुक्याला होईल. यावल तालुक्यात अनेक गावे ‘डार्क झोन’मध्ये आहेत. त्या गावातील पाण्याची पातळी वाढेल. दोन्ही तालुक्यांची पाण्याची चिंता मिटेल. सद्यःस्थितीत शेळगाव बॅरेजमध्ये साठ टक्के पाणी साठत आहे. शंभर टक्के पाणी साठविण्यासाठी वनविभागाची ११.९५ एकर जमिनीची अडचणी येत होती.

ती जमीन वनविभागाने दिल्यास बॅरेजमध्ये शंभर टक्के पाणी साठणार होते. वनविभागाची घेण्याचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेताच त्यांनी मुंबई, नागपूर, दिल्लीच्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी अनेक वेळा विषय लावून धरला.

Shelgaon Barrage
Agriculture Irrigation : आवर्तन नियोजनावेळी शेतकऱ्यांचा विचार करा
वन विभागाची जमीन मिळण्याबाबत नागपूर वन विभागाने मंजुरी दिली आहे. यामुळे शेळगाव बॅरेजमध्ये पाणी शंभर टक्के साठविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जून २०२४ मध्ये शंभर टक्के पाणी साठेल. याचा जळगाव, यावल तालुक्यांना मोठा फायदा होणार आहे.
संतोष भोसले, कार्यकारी अभियंता, जळगाव मध्यमप्रकल्प विभाग क्रमांक
शेळगाव बॅरेजमध्ये पाणी साठविण्यासाठी वनविभागाची जमीन हवी होती. मी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे घेतल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांची बैठका घेतल्या. मुंबई, दिल्ली येथे पाठपुरावा केला. सर्व लोकप्रतिनिधींचे सहकार्य मिळाले. वनविभागाची जमीन शेळगाव बॅरेज सिंचन प्रकल्पाला मिळाल्याने प्रकल्प पूर्ण होणार आहे.
आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com