Sugarcane Rate : मागच्या काही दिवसांपासून ऊसतोड मजुरांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला होता. दरम्यान यावर तोडगा काढत ऊसतोड मजुरांच्या तोडणी दरात ३४ टक्के वाढ केली. या दरवाढीमुळे राज्यातील ऊसतोड कामगारांना हंगामासाठी सुमारे ११५० कोटी रुपयांची म्हणजेच प्रत्येक मजुराला ११,५०० रुपयांची वाढ मिळाली. हा करार तीन हंगामासाठी करण्यात आला आहे. परंतु यातून शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार आहे. दरम्यान या निर्णयावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या तोडणी दराच्या वाढीमुळे कोल्हापूर विभागातील शेतकऱ्यांचे सुमारे २५० कोटी, तर राज्यातील ११५० कोटी रुपये एफआरपीतून दिले जाणार आहेत. केंद्राने शंभर रुपये एफआरपीत वाढ केली, तर दुसरीकडे तोडणी वाहतूक खर्चात ११५ रुपये वाढ झाली. तर रासायनिक खताचे दरही वाढले आहेत.
यामुळे यंदा शेतकऱ्यांचा फायदा नाहीतर तोटाच होणार आहे. या निर्णयामध्ये ४४० रुपये या वर्षी एक टन ऊसतोडीचा दर ठरला आहे. गेल्या वर्षी हाच दर कमिशन सह ३२५ रुपये होता. म्हणजे टनाला ११५ रुपये वाढ झालेली आहे. मुकादम वाढ कमिशन १९ टक्के होते, ते २० टक्के ही वाढ शेतकऱ्यांच्या तोडणी वाहतूक खर्चातून दिली जाते.
या वाढीसह म्हणजे टनाला ११५ रुपये तोडणी वाहतुकीचा खर्च वाढून ११५ रुपये एफआरपी कमी मिळणार आहे. ऊसतोड मजुरांना वाढ दिल्याचे दुःख होण्याचे कारण नाही. मात्र या मजुरांचा गावाकडून आणणे सोडण्याचा, कोयते, बांबू, वायर, रोप, विमा, झोपडी उभारण्याचा हे सर्व खर्च शेतकरी देतो. पण हेच मजूर इंट्री, खुशालीसाठी शेतकऱ्यांना वेठीस धरताना दिसतात. यामुळे शेतकऱ्यांच्यात तीव्र नाराजी आहे.
आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे म्हणाले, 'शेतकऱ्यांना चालू हंगामात जो वाढवून मिळालेला दर होता, तो तोडणी वाहतूक खर्च वाढवून काढून घेतला जात आहे. शेतकऱ्यांची एफआरपी ही वर्ष दोन वर्षात तीन टक्केने वाढवली जाते. पण मजुरांना वाढ देताना ३४ टक्के दिली जाते.
ऊस तोड मजुरांना दरवाढ दिली असल्यामुळे शेतकऱ्यांनी एंट्री खुशाली देऊ नये. ऊस बाहेर काढायला पण ट्रॅक्टरची सोय करू नका. कारण तोडणीमध्ये ऊस तोडून मोळ्या खांद्यावर वाहून, ऊस बाहेर काढून भरण्यासाठी दिली जात असते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.