Indian Agricultural Research : कृषी संशोधन विकसीत १०९ वाणांपैकी महाराष्ट्रातील हवामानाला २७ वाणांचा होणार उपयोग

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी मागच्या दोन दिवसांपूर्वी रविवारी (ता.११) दिल्लीच्या पुसा येथे भारतीय कृषी संशोधन संस्थेत १०९ वाणांचे वाटप केले.
Indian Agricultural Research
Indian Agricultural Researchagrowon
Published on
Updated on

Maharashtra Weather Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी मागच्या दोन दिवसांपूर्वी रविवारी (ता.११) दिल्लीच्या पुसा येथे भारतीय कृषी संशोधन संस्थेत १०९ वाणांचे वाटप केले. एकूण ६१ पिकांच्या १०९ वाणांमध्ये ३४० कोरडवाहू तर २७ बागायती वाणांचा समावेश आहे.

यामध्ये धान, गहू, कापूस, मका, तीळ, करडई, वैरण, राजगिरा, चौधारी शेंग, डाळिंब, पेरू, निशिगंध, ग्लाडिओलास यांचे २७ वाण महाराष्ट्रातील हवामानासाठी उपयुक्त ठरणार आहे.

'या' वाणांचा होईल उपयोग

धान : सीआर धान ४१६ (आईटी ३०२०१) आणि डीआरआर धान ७४ (आईटी ३०२५२)

गहू : पुसा गेंहू शरबती (एचआय १६६५) आणि पुसा गेंहू गौरव (एचआय-८८४०)

मका : पुसा पॉपकॉर्न हायब्रीड-१ (एपीसीएच-२), पुसा पॉपकॉर्न हायब्रीड-२ (एपीसीएच-३), पुसा बायो फोर्टीफाईड मेझ हायब्रीड-४ (एपीएच-४) आणि पुसा एचएम-४ मेल स्टेराईल बेबी कॉर्न-२ (एबीएसएच ४-२).

कबुतरी वाटाणा : (फुले पल्लवी) (फुले तूर १२-१९-२)

करडई (आयएसएफ १२३ एसईएल-१५) आणि (आयएसएफ-३००)

तीळ : तंजिला (सीयूएमएस-०९ ए)

वैरण : मोती बाजरी चारा (जवाहर पर्ल मिलेट १८-७), जवाहर बरसीम ०८-१७) आणि (एचक्यूपीएम २८)

कापूस : सीआयसीआर एच बीटी कॉटन- ४० (आयसीएआर- सीआयसीआर-पीकेव्ही ०८१ बीटी), शालिनी (सीएनएच १७३९५) (सीआयसीआर-एच कॉटन-५८), 'सीएनएच' (सीआयसीआर-एच एनसी कॉटन- ६४) आणि 'पीडीकेव्ही' धवल (एकेए-२०१३-८)

राजगिरा : आरएमए-१२० (जोधपूर राजगिरा २) आणि गुजरात राजगिरा ८ (जीए ८) एसकेएनए पक १४०७)

चौधारी शेंग : पीडब्ल्यूबी १७-१८ (फुले श्रावणी)

डाळिंब : सोलापूर अनारदाणा

पेरू : अर्का किरण

निशिगंध : अर्का वैभव

ग्लाडिओलस : अर्का आयुष

Indian Agricultural Research
Kolhapur Crop Damage : महापुराने ओला चारा कुजला; दूध व्यवसायावर परिणाम, शेतकऱ्यांचे बजेट कोलमडलं

मूल्यवर्धित शेतीकडे लक्ष देण्याची वेळ

आयसीएआरने विकसित केलेल्या विविध पिकांच्या या वाणांमुळे शेतीचा खर्च कमी होईलच, पण त्यामुळे पर्यावरण संवर्धन देखील होईल, असे मोदी यांनी यावेळी संवाद साधताना सांगितले. शेतकऱ्यांनी मूल्यवर्धित शेतीकडे लक्ष देण्याची वेळ आली आाहे.

पौष्टिक आणि जैविक खाद्य विकल्पाच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मोदी यांनी नमूद केले. उन्नत वाण तयार करण्यासाठी मेहनत घेतलेल्या कृषी वैज्ञानिकांचे मोदी यांनी कौतुक केले. व्यापक प्रमाणात हे वाण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावेत, यासाठी दरमहा या वाणांची माहिती दिली जावी, असेही मोदी म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com