
Pune News: भारतात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून,आतापर्यंत एकूण १०१० सक्रिय रुग्ण नोंदवले गेले आहेत. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, १९ ते २६ मे या कालावधीत देशभरात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये सर्वाधिक ४३० सक्रिय रुग्ण नोंदवले गेले आहेत. महाराष्ट्रात २१० सक्रिय रुग्ण आहेत. याशिवाय, दिल्लीत १०४, गुजरातमध्ये ८३, कर्नाटकात ४७ आणि तामिळनाडूत ६९ रुग्ण आढळले आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेला सतर्क केले आहे. राज्यात कोरोनाचे ३८३ सक्रिय रुग्ण आहेत. १९ मे नंतर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात जानेवारी २०२५ पासून ५२० जणांना कोरोनाची लागण झाली, यापैकी १३२ रुग्ण बरे झाले, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.
ठाण्यातील एक २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू गंभीर मधुमेहामुळे झाला, 'असे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.अनिरुद्ध माळगावकर यांनी सांगितले'. कोरोनाचा JN.१ व्हेरियंट हा ओमिक्रॉनचा उपप्रकार आहे.यामध्ये सर्दी, खोकला, हलका ताप आणि थकवा यांसारखी लक्षणे आढळतात.दिल्लीच्या एम्समधील तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्ट केले की, JN.१ हा नवीन व्हायरस नसून, तो सामान्य सर्दी-खोकल्यासारखा आहे आणि घातक नाही.
पावसाळ्यात आणि दाट लोकवस्तीत याचा प्रसार वेगाने होऊ शकतो. सिंगापूर, हाँगकाँग आणि थायलंडमध्येही JN.१ मुळे रुग्णसंख्या वाढली आहे. इतर आजार असलेल्या रुग्णांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना, अधिक धोका आहे. जानेवारीपासून महाराष्ट्रात वेगळा आजार असलेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाला.महाराष्ट्र सरकारने खबरदारी वाढवली आहे.
ठाणे सिव्हिल रुग्णालयात ४० खाटांचा विशेष कक्ष तयार करण्यात आला तिथे वैद्यकीय सुविधा सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत. मुंबई आणि पुण्यात चाचण्यांचे प्रमाण वाढवले आहे. ठाण्यात १० नवे रुग्ण आढळले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी म्हटले, “कोरोनासोबत जगण्याची सवय झाली आहे, पण सतर्कता महत्त्वाची आहे.”
नागरिकांना मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे आणि लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सतर्कता बाळगूनच या संकटावर मात करता येईल.महाराष्ट्रात सध्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसत असून,आरोग्य विभागाने नागरिकांना घाबरून न जाता सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.