Solar Fencing Subsidy: सौर कुंपणासाठी १००% अनुदान: वनमंत्री नाईक यांची मोठी घोषणा!

Forest Minister Ganesh Naik: व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारी असलेल्या शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर सौर कुंपण देण्याचा निर्णय वनमंत्री गणेश नाईक यांनी जाहीर केला. जंगलातील मानवी हस्तक्षेप रोखण्यासाठी आणि वाघांचा अधिवास सुरक्षित करण्यासाठी फळझाडांची लागवड करण्याचीही घोषणा करण्यात आली.
Forest Minister Ganesh Naik
Forest Minister Ganesh NaikAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: व्याघ्र प्रकल्पाशेजारी असलेल्या गावांमधील शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानात सौर कुंपण उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा वनमंत्री गणेाश नाईक यांनी विधानसभेत केली. त्यासंदर्भातील आदेश आधीच दिल्याचीही माहिती त्यांनी सभागृहात दिली. काँग्रेसचे सदस्य विजय वडेट्टीवार, अस्लम शेख, नरेंद्र भोंडेकर, संजय मेश्राम, विकास ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर नाईक यांनी माहिती दिली.

भंडाऱ्यालगत असलेल्या कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफर झोनपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या कवलेवाडा येथील जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केला. यात ती मृत्युमुखी पडली. बीटी १० ही वाघीण आणि तिचा दोन वर्षांचा बछडा नरभक्षक असून त्याला जंगलात सोडण्यास नागरिकांनी विरोध केला तरीही वन विभागाने विरोध झुगारून त्यांना जंगलात सोडले आहे.

Forest Minister Ganesh Naik
Forest Minister Ganesh Naik : शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या भरपाईत सुधारणा करू

त्यामुळे गंडेगाव, सावरला, चन्नेवाडा, कन्हाळागाव, घानोरी, सिरसाळा, वायगाव, भुयार ही गावे भीतीच्या छायेखाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले आहे. शेतकऱ्यांना भीतीमुक्त करण्यासाठी सौर कुंपण आणि चेन फेन्सिंग मोफत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली. तसेच वाघांचे स्थलांतर करावे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

Forest Minister Ganesh Naik
Vidarbha Tiger Crisis: देशातील वाघांचे सर्वाधिक मृत्यू विदर्भात

यावर उत्तर देताना वनमंत्री नाईक म्हणाले, की वाघीण आणि तिच्या बछड्याकडून हल्ले होत आहेत, ही बाब खरी आहे. या बीटी १० या वाघिणीच्या बछड्याला पकडून अन्यत्र हलविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सौर कुंपण योजनेअंतर्गत शेतकरी हिस्सा रद्द करून १०० टक्के अनुदान देण्यात येईल. यासाठी २०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. चेन फेन्सिंगसाठी अधिक निधी मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करू.

दाट जंगलात फळझाडांची लागवड

वनांमधील मानवी हस्तक्षेपामुळे वाघांचा अधिवास संपुष्टात आला. परिणामी वाघ मानवी वस्तीत शिरत असल्याचे वनमंत्री नाईक म्हणाले. वाघांना शिकार मिळावी यासाठी शाकाहारी प्राण्यांची संख्या वाढली पाहिजे. यासाठी दाट जंगलात सीताफळ, जांभूळ, फणस यांसारख्या फळांची झाडे लावली जातील. त्यामुळे त्यावर जगणाऱ्या प्राण्यांची शिकार वाघांना मिळेल आणि ते आपल्या अधिवासात राहतील. ही प्रक्रिया दीर्घ काळ चालणारी आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचेही वनमंत्री नाईक म्हणाले.

राज्यात ४४४ वाघ

राज्यातील वाघांची संख्या वाढल्याचीही माहिती वनमंत्री नाईक यांनी दिली. राज्यात २००१ मध्ये १०१ वाघ होते. सध्या ती संख्या ४४४ वर पोहोचली असल्याचे ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com