Sheep Goat Board : मेंढी, शेळी महामंडळाला १०० कोटींचे भागभांडवल

Goat Farming : १९७८ ला या महामंडळाची निर्मिती करण्यात आली होती. या महामंडळासाठी २५ कोटी रुपयांचे भागभांडवल देण्यात आले होते.
sheep Goat
sheep GoatAgrowon

Mumbai News : राज्यातील शेळी, मेंढी पालकांच्या उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे भागभांडवल २५ कोटींवरून ९९ कोटी ९९ लाख रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत शनिवारी (ता. १६) घेण्यात आला.

१९७८ ला या महामंडळाची निर्मिती करण्यात आली होती. या महामंडळासाठी २५ कोटी रुपयांचे भागभांडवल देण्यात आले होते. ‘आयसीएमआर’च्या शिफारशींनुसार प्रतिमाणसी ३० ग्रॅम मांस उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र, सध्या भारतात केवळ १५ ग्रॅम मांस उपलब्ध आहे. ही तफावत दूर करण्यासाठी राज्यातील शेळी, मेंढ्यांची उत्पादकता व कार्यक्षमता वाढविण्यासाठी विविध योजना हाती घेण्यास मोठा वाव आहे.

sheep Goat
Goat-Sheep Market : शेळ्या-मेंढ्यांसाठी प्रसिद्ध झालाय शिरूरचा बाजार

तत्कालीन पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी महामंडळांच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न केले होते. मात्र, मध्यंतरी फारसे प्रयत्न झाले नाहीत. शेळी आणि मेंढ्यांच्या उच्च उत्पादन क्षमता असलेल्या स्थानिक प्रजातींमध्ये सुधारणा व संवर्धन, त्यांची संख्या वाढविणे, पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे, आरोग्य विषयक सुविधा तसेच बॅकवर्ड व फॉरवर्ड लिंकेजेस उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाच्या भागभांडवलात वाढ केली आहे.

sheep Goat
Madgyal Sheep : माडग्याळ मेंढीची नोंद कधी घेणार?

शेती महामंडळाची जमीन ‘एमआयडीसी’ला हस्तांतरित

श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन ‘एमआयडीसी’ला हस्तांतरित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बेलवंडी मळ्यातील म्हणजे पार्वतीवाडी येथील १७८.७४ हे. आर. आणि मौ. पिसोरे बुद्रूक येथील ७३.६९ हे.आर. अशी शेती महामंडळाची २५२. ४३ हे. आर जमीन नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याकरिता विनामूल्य देण्यात येणार आहे.

विणकर समाजासाठी ५० कोटी भागभांडवल

विणकर समाजासाठी स्वतंत्र विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून ५० कोटी भागभांडवल देण्याचा निर्णय घेण्यात आला. या महामंडळावर अध्यक्ष व उपाध्यक्षांसह ३ अशासकीय सदस्य आणि ७ शासकीय सदस्य राहतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com