Milk Subsidy : सातारा जिल्ह्यात ५६ लाखांचे दूध अनुदान प्रलंबित

Dairy Farmer Grant : गेल्या वर्षभरातील तीन टप्प्यांतील पाच व सात रुपयांप्रमाणे १०० कोटी रुपये दूध अनुदान जिल्ह्याला उपलब्ध झाले आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर हे अनुदान वितरित झाले आहे.
Dairy Milk
Dairy MilkAgrowon
Published on
Updated on

Satara News : गेल्या वर्षभरातील तीन टप्प्यांतील पाच व सात रुपयांप्रमाणे १०० कोटी रुपये दूध अनुदान जिल्ह्याला उपलब्ध झाले आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर हे अनुदान वितरित झाले आहे. याचा एक लाखांवर शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. २०२५ मधील ५६ लाखांचे दूध अनुदान अद्याप येणे बाकी आहे.

जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून शेतीला पूरक म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र दूध व्यवसायात उत्पादन खर्चाच्या तुलनेत दर कमी असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहेत. हे ओळखून शासनाने दूध उत्पादकांना लिटरला पाच व सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या वर्षी शासनाने पहिल्या टप्प्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपयेप्रमाणे अनुदान जाहीर केले होते.

जानेवारी ते मार्च २०२४ मध्ये जिल्ह्यातील २३ दूध प्रक्रिया प्रकल्‍पांना एक लाख सात हजार १९१ दूध उत्‍पादकांना १७ कोटी ७८ लाख ५५ हजार ४२० रुपये मिळाले आहे. तर बॅंक खाते क्रमांक, आधार क्रमांक चुकीचे, टॅग नंबर आदी कारणामुळे दोन कोटी तीन लाख १२ हजार रुपये अनुदान थकले होते.

Dairy Milk
Milk Subsidy: शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश – दुधाला थेट अनुदान मंजूर!

तर दुसऱ्या टप्‍प्‍यात ७३ दूध प्रक्रिया प्रकल्पांना ते नोव्हेंबर २०२४ मध्ये ४४ कोटी ४९ लाख तीन हजार १९५ रुपये अनुदान मिळाले आहे. विविध कारणांनी एक कोटी ३७ लाख ९४ हजार ५२३ रुपये थकले होते. तिसऱ्या टप्प्यातील ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२४ मध्ये ३७ कोटी ६२ लाख १६ हजार रुपये मिळाले होते.

Dairy Milk
Milk Subsidy : दूध उत्पादकांसाठी अनुदान योजना राबवण्याचा विचार नाही; केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धविकास राज्यमंत्र्यांचे लेखी स्पष्टीकरण

चुकीच्या कागदपत्रांअभावी गतवर्षीच्या तीन टप्प्यांतील पाच व सात रुपयांप्रमाणे १०० कोटी रुपये दूध अनुदान जिल्ह्याला उपलब्ध झाले आहे. एकूण तीन कोटी ४१ लाख सात हजार रुपये अनुदान थकले होते. हा निधी जमा झाला असून कागदपत्रांची दुरुस्ती होईल तसतसे अनुदान जमा होत असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.

अनुदानाची यंदाही ढकलगाडी?

दूध अनुदान २०२५ मधील अद्याप उपलब्ध झालेले नाही. नवीन वर्षातील मार्च अखेरपर्यंतचे ५६ लाखांचे अनुदान शासनाकडे प्रलंबित आहे. गेल्या वर्षी अनुदानाची ढकलगाडी वर्षअखेरपर्यंत थांबली. आता या वर्षीही दूध अनुदानाची ढकलगाडी राहणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com