Lightning Safety : वीज अटकाव यंत्रासाठी एक कोटीची तरतूद ः पालकमंत्री शिरसाट

Minister Sanjay Shirsath : जिल्ह्यातील वीज प्रवण भागामध्ये वीज अटकाव यंत्र बसवण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीने १ कोटी रुपयांच्या तरतुदीला मान्यता दिल्याची माहिती पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली.
Lightning
Lightning Agrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : जिल्ह्यातील वीज प्रवण भागामध्ये वीज अटकाव यंत्र बसवण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीने १ कोटी रुपयांच्या तरतुदीला मान्यता दिल्याची माहिती पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली.

जिल्हा नियोजन समितीची पालकमंत्री शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. १२) बैठक झाली. यानंतर त्यांनी ही माहिती दिली. पालकमंत्री श्री. शिरसाट म्हणाले, की पावसादरम्यान वीज पडून मृत्यू मोठ्या प्रमाणात होत आहेत.

वीज पडून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी वीज अटकाव यंत्रांची जिल्ह्यात संख्या वाढवावी लागणार आहे. आता कोणत्याही गावाला स्मशानभूमी नाही, असे होणार नाही. यासाठी विधानसभा क्षेत्रनिहाय एक कोटी रुपयांच्या निधीला जिल्हा नियोजन समितीतून देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या निधीतून स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता, शेड आणि संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहेत.

Lightning
Lightning Safety : जीवित, वित्तहानी टाळण्यासाठी भूभागावर वीज अटकाव यंत्रे बसवा

ते म्हणाले, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १० कोटी वृक्ष लागवड उपक्रमाच्या अनुषंगाने आपले संभाजीनगर हरित संभाजीनगर हे अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानातून झाडे लावण्याचा ठराव घेण्यात आला आहे. यासाठीचा वृक्षारोपण कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी तयार करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

मागेल त्याला सौर कृषिपंप या योजनेसाठी महावितरणला २५ कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली. यामध्ये पारंपरिक विद्युत जोडणीऐवजी पारेषण विरहीत सौर पंपासाठी निधी उपलब्ध करून देण्याला मंजुरी दिली जाणार आहे. सर्व शासकीय कार्यालये सौर ऊर्जेवर करण्यासाठी या बैठकीत १५ कोटी रुपयांच्या निधीच्या तरतुदीला मंजुरी देण्यात आल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

Lightning
Lightning Safety for Animal: वीज पडण्यामुळे होणारे पशूंचे नुकसान अन् उपाययोजना

घाटी दवाखान्यामध्ये उपचारासाठी येणाऱ्या मराठवाडा आणि विदर्भातील रुग्णांना सिटीस्कॅन आणि एमआरआयच्या खर्चातील ५० टक्के आर्थिक भार जिल्हा नियोजन समिती उचलणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहितीही श्री. शिरसाट यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली.

बैठकीत महत्त्वाचे

वंदे मातरम सभागृह महापालिकेकडे हस्तांतराचा निर्णय

छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासह कोणत्याही महापुरुषांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाला निधी कमी पडणार नाही

वेरुळमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्वजांच्या गढीच्या सौर ऊर्जेसाठी एक कोटी रुपयांची तरतूद

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कन्नड, खुलताबाद येथे सीसीटीव्ही लावण्यासाठीच्या प्रस्तावावर होणार विचार

खतांची लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश

शेतकऱ्यांना कर्ज देण्यास बॅंकांकडून टाळाटाळ, सोमवारी बॅंकांची बैठक घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com