Ragini Rate Kolhapur : 'दरात द्यायचे आणि मापात मारायचे' नाचणी खरेदीत शेतकऱ्यांची लूट

Looting of Farmers Ragini : यंदा पाऊस कमी झाल्याने नाचण्याच्या उत्पादनात घट आल्याने दरात प्रचंड वाढ झाली आहे.
Ragini Rate Kolhapur
Ragini Rate Kolhapuragrowon

Kolhapur Ragini Rate : यंदा पाऊस कमी झाल्याने नाचण्याच्या उत्पादनात घट आल्याने दरात प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, त्याचा लाभ शेतकऱ्यांच्या पदरात कितपत पडतो, हा खरा सवाल उपस्थित केला जात आहे. व्यापाऱ्यांकडून गावोगावी जाऊन शासकीय हमीभावानेच खरेदी केली जात असली तरी काटा मारी होत असल्याच्या तक्रारी आहेत.

'दरात द्यायचे आणि मापात मारायचे' या प्रकारामुळे शेतकऱ्यांची लूट सुरु आहे. याबाबत प्रशासनाने ठोस भूमिका घेण्याची मागणी होत आहे.

या वर्षी खरीप हंगामात ऐन पोटरीच्या कालावधीतच पावसाने दडी दिली. त्यामुळे माळरानावरील या पिकाला मोठा फटका बसला. कोकण घाटमाथ्याला लागून असलेल्या शेत जमिनीत या पिकाच्या उत्पादनावर फारसा फरक पडला नाही, मात्र कमी पावसाच्या परिसरात हे पीक वाळून गेले. गेल्या काही वर्षात या पिकाला मोठी मागणी आहे. नाचणीवर प्रक्रीया करणारे उद्योग वाढल्यामुळे त्यांच्याकडूनही मागणी आहे.

मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने दरात वाढ झाली आहे. शासकीय दराने नाचणा खरेदी करणाऱ्या केंद्राकडे सद्या ३८०० रुपये हमीभाव आहे. मात्र, त्यासाठी हंगामपूर्व नोंदणी गरजेची असल्याने सर्वच शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नसते. त्याचा फटका त्यांना बसतो.

Ragini Rate Kolhapur
Kolhapur Patgaon Dam : गौतम अदानींचे मनसुबे कोल्हापूरकरांनी उधळले, पाटगाव धरणातील पाणी देण्यास स्थगिती

मात्र गेल्या महिनाभरापासून काही व्यापारी गावोगावी जाऊन खरेदी करीत आहेत. त्यांच्याकडूनही शासनाचाच दर सांगितला जातो. मात्र क्विंटलला सुमारे तीन ते पाच किलोची काटेमारी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी वाढीव दर फसवाच ठरतो. यासंदर्भात प्रशासनाने व्यापाऱ्यांचे वजन काटे तपासायला हवेत.

चुकीचा व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करायला हवी. शासकीय दराने धान्य खरेदी करणाऱ्या केंद्रांनीही नोंदणीची सक्ती न करता शेतकऱ्यांचा माल खरेदी करायला हवा तरच या परिस्थितीचा शेतकऱ्यांना लाभ होईल.

शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या दरानेच प्रक्रिया उद्योगांना व्यापारी नाचणा विक्री करतात. यातच त्यांचा काळाबाजार उघड होतो. काटामारी केल्यामुळेच हे शक्य होते. यावर अंकुश लावणे गरजेचे आहे. नितीन पाटील, अध्यक्ष, बळीराजा शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com