चीन, इंडोनेशियासारख्या देशांना पशुखाद्यासाठी मक्याऐवजी तांदळाचा आधार

पश्चिम, दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियातून मागणी वाढल्याने मक्याच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे पशुखाद्यासाठी (Animal Feed) व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि चीनसारख्या देशांमधील खरेदीदार तुकडा तांदळाकडे (Broken Rice) वळत आहेत.
Maize Rate
Maize RateAgrowon
Published on
Updated on

पश्चिम, दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियातून मागणी वाढल्याने मक्याच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे पशुखाद्यासाठी (Animal Feed) व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि चीनसारख्या देशांमधील खरेदीदार तुकडा तांदळाकडे (Broken Rice) वळत आहेत. बिझनेसलाईनने ही बातमी दिली आहे.

Maize Rate
युक्रेनने मका आणि सूर्यफूल तेलावरील निर्यातबंदी उठवली!

आखाती देशांबरोबरच (Gulf County) बांगलादेश, व्हिएतनाम, इंडोनेशिया येथून मक्याला मोठी मागणी (Big Demand For Maize) आहे. मात्र, किमती वाढल्या आहेत आणि उपलब्धता कमी आहे. कारण नवीन पीक येण्यासाठी पुढचा महिना उजाडणार असल्याचे कोलकाता येथील बेंगानी एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बिमल बेंगानी (Bimal Bengani) यांनी सांगितले आहे. तर रशिया-युक्रेन संघर्षामुळे (Russia Ukrain War) किमतीत वाढ झाल्यामुळे निर्यात मंदावली आहे. त्यामुळे व्हिएतनाम आणि इंडोनेशिया हे देश तुकडा तांदळाकडे वळत असल्याचे अॅग्री कमोडिटीज एक्पोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष (एसीईए) एम. मदन प्रकाश (M. Madan Prakash) यांनी म्हटले आहे.

Maize Rate
देशातून बांगलादेशात ८० हजार टन मका निर्यात

मुबाला अॅग्रो कमोडीटीजचे सहसंस्थापक मुकेश सिंग यांनी सांगितले की, सध्या निर्यातदार छोट्या आणि तातडीच्या ऑर्डर स्विकारत आहेत,ज्या कंटेनरमधून पाठवता येवू शकतात. खाद्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी ओमान आणि इतर आखाती देश गुजरातमधील कांडला येथून मका मागवत आहेत.

खरीपातील मका जवळपास संपल्यामुळे देशांतर्गत मक्याचे दरही वाढले आहे. मक्याची किमान आधारभूत किंमत १८७० रुपये प्रति क्विंटल असली तरी सध्या मक्याचे दर २२००-२५०० रुपये प्रति क्विंटल आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर काळ्या समुद्रातील मालवाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे जागतिक निर्यातीत १६ टक्क्यांचा वाटा असलेल्या युक्रेनकडून होणारा पुरवठा खंडित झाल्याने मक्याची मागणी वाढली आहे.

देशातील प्रमुख शेतमालापैकी या आर्थिक वर्षात मक्याची निर्यात चांगली झाली असून पहिल्या १० महिन्यांत ३० टक्क्यांहून अधिक निर्यातीत वाढ झाली आहे. अपेडाच्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जानेवारी या कालावधित १.७४ अब्ज डॉलर किमतीच्या ३१.६ लाख टन मक्याची निर्यात झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत २३.७ लाख टन मक्याची निर्यात झाली होती. ज्याचे मूल्य ५२७ दशलक्ष डॉलर इतके होते.

जोपर्यंत देशांतर्गत बाजारात मक्याच्या किमती १७००-१८०० प्रति क्विंटल होत्या, तोपर्यंत मक्याची निर्यात करणे निर्यातदारांना (Maize Exporters) शक्य होतं. डिसेंबरपर्यंत बांगलादेशने सर्वाधिक १२.५ लाख टन मका खरेदी (Maize Procurement) केला होता, तर व्हिएतनामने ९.५ लाख टन खरेदी केला होता. त्यामुळे चढ्या किमती पाहता १०० टक्के तुकडा तांदळाला मागणी जास्त आहे. तुटवड्यामुळे आता तुकडा तांदळाच्या किमतीही जवळपास मक्याच्या किमतींच्या जवळपास पोहचल्या आहेत. तुकडा तांदळाच्या किमती २१०० रुपये प्रति क्विंटलहून अधिक झाल्या असून १०० टक्के तुटलेल्या तुकडा तांदळाच्या किमती २५ टक्के तुटलेल्या तुकडा तांदळाच्या बरोबरीने आहेत. आयजीसीच्या डेटानुसार, गेल्या आठवड्याच्या शेवटी २५ टक्के तुटलेल्या तुकडा तांदळाच्या किमती ३४९ डॉलर प्रति टन होत्या.

अपेडाच्या डेटानुसार चीनने गेल्या आर्थिक वर्षात भारतीय तांदूळ आयात करण्यास सुरुवात केल्यानंतर चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-डिसेंबर कालावधीत ११ लाख टन आणि व्हिएतनामने ६ लाखटन तांदूळ खरेदी केला. गेल्या वर्षी जानेवारी-ऑगस्टमध्ये भारताने चीनला केलेल्या तांदळाच्या निर्यातीपैकी ९७ टक्के वाटा तुटलेल्या तांदळाचा होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com