सोलापुरात बेदाण्याला कमाल २५१ रुपये दर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या आठवड्यातील बेदाणा लिलावात बेदाण्याला प्रतिकिलोला सर्वाधिक २५१ रुपयांचा प्रतिकिलोदर मिळाला आहे. एकूण ३६ टन बेदाणा आवक झाली होती. त्यापैकी २० टन बेदाण्याची विक्री झाली.
सोलापुरात बेदाण्याला कमाल २५१ रुपये दर
सोलापुरात बेदाण्याला कमाल २५१ रुपये दर

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या आठवड्यातील बेदाणा लिलावात बेदाण्याला प्रतिकिलोला सर्वाधिक २५१ रुपयांचा प्रतिकिलो दर मिळाला आहे. एकूण ३६ टन बेदाणा आवक झाली होती. त्यापैकी २० टन बेदाण्याची विक्री झाली. त्यातून ३ कोटी ३८ लाख रुपयांची उलाढाल झाली.  दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिरपनहळ्ळी येथील गंगाधर बिराजदार यांच्या बेदाण्यास सर्वाधिक २५१ रुपयांचा दर मिळाला. खरेदीसाठी तासगाव, सांगली, विजापूर येथील व्यापारी येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बेदाण्याच्या दरात तेजी आहे. आठवड्यातून एकदा दर गुरुवारी बाजार समितीमध्ये बेदाण्याचे लिलाव होतात. सध्या बेदाण्याची सर्वाधिक आवक स्थानिक भागातूनच आहे. दरम्यान, बेदाण्याचा हंगामही आता अंतिम टप्प्यात आला आहे. यंदा ऑक्टोबर महिन्यात पाऊस झाल्याने एक महिना उशिराने हंगाम सुरू झाला. त्यामुळे उत्पादनात काहीशी घट होण्याची शक्यताही बेदाणा उत्पादकांनी व्यक्त केली आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक २५ हजाराहून अधिक एकरवर द्राक्षाचे क्षेत्र आहे. त्यापैकी सुमारे ८० टक्के क्षेत्रावरील द्राक्षांचा बेदाणा तयार होतो. पंढरपूर, सांगोला, बार्शी, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या भागांत प्रामुख्याने बेदाणा शेड आहेत.   अशी आवक, अशी विक्री गुरुवारी झालेल्या लिलावावेळी बसवेश्‍वर ट्रेडर्सकडे ४१४४ किलो आवक होती, त्यापैकी २ हजार ७२ किलो विक्री झाली. ४० ते २१७ रुपयांचा दर मिळाला. विश्‍वजित हेले यांच्याकडे १६४७ किलो आवक झाली होती, त्यापैकी ८२४ किलोची विक्री झाली. ४० ते १८७ रुपये प्रतिकिलो दर मिळाला. व्ही. आर. बिराजदार यांच्याकडे ९ हजार ६०५ किलोची आवक झाली होती, त्यापैकी ४८०३ किलो विक्री झाली. ४० ते २२१ रुपयांचा दर मिळाला. रक्षा ट्रेडिंग कंपनीकडे ५४६३ किलो आवक असून, २७३२ किलो विक्री झाली. ४० ते २११ रुपयांचा दर मिळाला आहे. पंडित अंबारे यांच्याकडे ३२४४ किलोची आवक झाली असून, ३२४४ किलोची विक्री झाली आहे. ४० ते २५१ रुपयांचा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com