Agriculture Loan : थकीत कर्ज कमी करण्यावर ‘मध्यवर्ती’चा फोकस

थकीत कर्जाचे प्रमाण कमी करून बँकेचा कारभार सुरळीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
Agriculture LOan
Agriculture LOanAgrowon

यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (Yavatmal DCC Bank) यंदा उद्दिष्टापेक्षा जास्त कर्जवाटप (Loan Supply) केले आहे. ती वसूल करण्यासाठी जिल्हा बँकेने कंबर कसली आहे. त्याकरिता जिल्हास्तरीय कर्जवसुली आढावा सभा घेण्यात आली.

Agriculture LOan
Crop Loan : रब्बीत पीककर्जाचा टक्का घसरला

जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त आहे. त्यामुळे शासनाने मध्यवर्ती सहकारी बँकेला कर्जवाटपाचे उद्दिष्ट दिले होते. बँकेने दिलेल्या कर्जवाटपापेक्षा जास्त कर्जवाटप केले आहे. त्यामुळे आता कर्जवसुली करणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जरक्कम भरावी, यासाठी जिल्हा बँकेने कंबर कसली आहे. थकीत कर्जाचे प्रमाण कमी करून बँकेचा कारभार सुरळीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

Agriculture LOan
Crop Loan : रब्बीत २१६ कोटींचे पीककर्ज वाटप

जिल्हा मध्यवर्ती बँकेमुळे अनेक शेतकऱ्यांना कर्ज मिळाले आहे. पीककर्जाची वाटप रक्कम मोठी असली तरी ती शंभर टक्के परतावा होते. शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन बँकेने केले आहे. शेतीसंस्थांचे अध्यक्ष, सचिवांनी उद्दिष्टपूर्ती केल्यास त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाणार आहे.

सभेला जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे, संजय देरकर, मनीष पाटील, प्रकाश मानकर, शिवाजी राठोड, राजूदास जाधव, राजीवरेड्डी येल्टीवार, संजय मोघे, स्नेहल भाकरे, आशीष लोणकर, सीईओ मुकुंद मिरगे, सरव्यवस्थापक प्रवीण दुधे, उपसरव्यवस्थापक सुशील राऊत, प्रशासन अधिकारी रणजित गिरी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर यांनी केले. संचालन श्रीकांत राऊत यांनी केले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांची आहे. ती व्यवस्थित स्थितीत ठेवण्याची आमची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांना दिलेले कर्ज वेळेत परत आले, तर त्यांनाही फायदा होणार आहे. ३१ मार्चपूर्वी शून्य टक्केच व्याज शेतकऱ्यांना लागणार आहे. यात शेतकऱ्यांचाच फायदा आहे.

-प्रा. टिकाराम कोंगरे, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com