Seed Conservation : याहा मोगी माता बियाणे संवर्धन समितीचा आज पुरस्काराने गौरव

Yaha Mata Mogi : दहा लाख रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या जागतिक परिषदेसाठी आंतरराष्ट्रीय जैवविविधता करार अंतर्गत १५० देशांतील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
Bogus Seed
Bogus SeedAgrowon
Published on
Updated on

Pune News : पीक वाण संवर्धन आणि शेतकरी हक्क प्राधिकरण, भारत सरकारतर्फे पीक वाण संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी दिला जाणारा ‘राष्ट्रीय वनस्पती जनुक संवर्धक समुदाय पुरस्कार २०-२१’ हरणखुरी (ता. धडगाव, जि. नंदुरबार) येथील याहा मोगी माता बियाणे संवर्धन समितीस जाहीर झाला आहे. ही समिती बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन अंतर्गत कार्यरत आहे.

नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेमध्ये जागतिक अन्न व कृषी संस्था आणि भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत आयोजित ‘कृषी जैवविविधता आणि शेतकरी हक्क’ या जागतिक परिषदेमध्ये मंगळवारी (ता. १२) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते याहा मोगी माता बियाणे संवर्धन समितीस हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दहा लाख रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या जागतिक परिषदेसाठी आंतरराष्ट्रीय जैवविविधता करार अंतर्गत १५० देशांतील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

Bogus Seed
Seed Conservation : समाजाच्या प्रयत्नातून पारंपरिक बियाणे संवर्धन

या बाबत माहिती देताना बाएफ संस्थेचे मुख्य कार्यक्रम अधिकारी (कृषी जैवविविधता) संजय पाटील म्हणाले की, बाएफ संस्थेमार्फत नंदुरबार जिल्ह्यात २०१० पासून लोक सहभागातून पिकांच्या स्थानिक वाणांचे संवर्धन, उत्पादन आणि प्रसाराचे काम सुरू झाले. या माध्यमातून मका, ज्वारी, भरड धान्य पिके, कडधान्यांच्या शंभराहून अधिक वाणाचे संवर्धन, अभ्यास आणि लागवड केली जाते.

Bogus Seed
Seed Conservation : सातपुडा बीजोत्सवाचे सालईबन येथे आयोजन

धडगाव, अक्कलकुवा तालुक्यांतील पंधरा गावांमध्ये मका, ज्वारी, भादी, बर्टी, कडधान्ये, तेलबिया आणि भाजीपाला पिकांच्या १०८ स्थानिक पीक वाणांचे संवर्धन आणि बियाणे उत्पादन केले जाते. हरणखुरी, चोंदवडे गावांत दोन सामूहिक बियाणे बॅंकामार्फत मका, ज्वारी, भादी, बर्टी इत्यादी पिकांचे २५ टन बियाणे उत्पादन आणि १७० टन धान्य उत्पादन आणि विक्री करण्यात आली आहे.

याहा मोगी माता बियाणे संवर्धन समितीच्या बीज संवर्धन कार्यामध्ये मोचाडा पावरा, नाना पावरा, सुभाष पावरा, जयसिंग पावरा, जोरदार पावरा, बुरज्या पावरा, बावा पावरा आदी बियाणे संवर्धकांचा सहभाग आहे. या समितीला बाएफ संस्थेतील प्रकल्प अधिकारी लिलेश चव्हाण, विभागीय प्रमुख व्ही. बी. द्‌यासा आणि मुख्य कार्यक्रम समन्वयक सुधीर वागळे आदी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com