Tehsildar On Protest : महसूल विभागाचे कामकाज ठप्प

नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग २ यांना ग्रेड पे ४८०० रुपये मिळावा, या मागणीसाठी सोमवार (ता. ३) पासून तहसीलदार, नायब तहसीलदार बेमुदत संपावर गेले आहेत.
Department Of Revenue
Department Of RevenueAgrowon

Jalgaon News : नायब तहसीलदार (Naib Tehsildar Protest) राजपत्रित वर्ग २ यांना ग्रेड पे ४८०० रुपये मिळावा, या मागणीसाठी सोमवार (ता. ३) पासून तहसीलदार, नायब तहसीलदार बेमुदत संपावर गेले आहेत. यामुळे सर्वच तहसीलदार कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते.

या बाबत शेतकरी, ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने हे आंदोलन थांबवावे, संबंधितांचे वेतन व पुढील बढत्या रोखा, अशी मागणी शेतकरी किरण पाटील (सनपुले, ता. चोपडा, जि. जळगाव) यांनी केली आहे.

Department Of Revenue
Tehsildar On Protest : राज्यात नायब तहसीलदारांचे बेमुदत कामबंद आंदोलन

यातच तहसीलदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. ५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत घोषणाबाजी केली. ‘तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेचा विजय असो’, ‘हम सब एक है’, ‘कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’ आदी घोषणांनी परिसर दणाणला होता.

कर्मचारी कामावर आहेत. मात्र साहेब नसल्याने नागरिकांच्या प्रकरणांवर सह्या करणार कोण, अशी स्थिती तहसीलदार कार्यालयात आहे. मार्च महिन्यात सात दिवस शासकीय कर्मचाऱ्यांनी संप केला होता. त्यामुळे नागरिकांची कामे रखडली होती. आता तहसीलदार, नायब तहसीलदारांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने नागरिकांची कामे पुन्हा ठप्प झाली आहेत.

Department Of Revenue
Tehsildar Protest : तहसील कार्यालयांत कामे खोळंबली

१९९८ ला नायब तहसीलदार वर्ग २ राजपत्रित पद करण्यात आले. मात्र ग्रेड पे वर्ग ३ चाच ठेवण्यात आला. समकक्ष वर्ग २ अधिकारी यांचा ग्रेड पे जास्त आहे.

नायब तहसीलदार महत्त्वाचे पद असून, अनेक वेळा समन्वयाची भूमिका पार पाडावी लागते.

नायब तहसीलदारांचा ग्रेड पे वाढविण्यासाठी अनेक वेळा शासनाला पत्रव्यवहार करण्यात आला आहे. वेळोवेळी वित्त आयोग, तसेच बक्षी समितीसमोर या विषयावर सादरीकरण करण्यात आले आहे.

शासनाने २०१५ मध्ये नायब तहसीलदारांना ४८०० ग्रेड पे देण्याबाबत तत्वतः मान्यता दिली आहे. त्यानंतर आलेल्या बक्षी समितीने या मागणीचा विचार केला नाही. शासनाने या बाबत निर्णय घेतला नाही. त्यामुळे कामबंद आंदोलन सुरू केले आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा तहसीलदार महेंद्र माळी, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, तहसीलदार सुरेश थोरात, तहसीलदार पंकज लोखंडे, सहायक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी, सुनील समदाणे आदींनी आंदोलनात भाग घेतला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com