Loksabha Election : उमेदवारीच्या संकेताने भाजप नेते लागले कामाला

Political News : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक असताना, विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
BJP
BJPAgrowon

Pune News : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक असताना, विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाने आघाडी घेत, विधानसभा आणि लोकसभा मतदार संघ प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्यांमध्ये बहुतांश मतदार संघात संभाव्य उमेदवारीच्या संकेताने अनेक पदाधिकारी कामाला लागले आहेत. यामुळे शिरूर लोकसभा मतदार संघातील शिवसेना (शिंदे गटात) अस्वस्थता निर्माण झाली आहे.

पुणे जिल्ह्यात शहर आणि जिल्हा असे विधानसभेचे २१ मतदार संघ, तर लोकसभेचे शिरूर, बारामती, पुणे आणि मावळ असे चार मतदार संघ आहेत. या सर्व मतदार संघात निवडणूक प्रमुखांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. या नियुक्‍त्यांमध्ये संभाव्य उमेदवारीचे संकेत दिल्याने भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे.

BJP
NCP Party : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा निर्णय येत्या दोन दिवसांत

उत्तर पुणे जिल्ह्यातील आणि शिरूर लोकसभा मतदार संघातील जुन्नर (आशाताई बुचके), खेड (अतुल देशमुख) आंबेगाव (जयश्री पलांडे), शिरूर (प्रदीप कंद), आणि हडपसर (योगेश टिळेकर) यांच्या नियुक्त्यांमुळे हे सर्व संभाव्य उमेदवार असल्याचे संकेत असल्याची चर्चा आहे. तर भोसरीमधून विद्यमान आमदार महेश लांडगे यांची उमेदवारी अंतिम असल्याचे मानले जात असून, या ठिकाणी विकास डोळस यांची नियुक्ती केली आहे.

दरम्यान जुन्नरमधून आशाताई बुचके या दोनवेळा शिवसेनेकडून आणि एकदा भाजपच्या छुप्या पाठिंब्यावर विधानसभा लढल्या होत्या. मात्र या तीनही वेळी त्यांना अपयश आले आहे. तर अतुल देशमुख यांनी खेडमधून २०१९ मध्ये बंडखोरी करत मोठे मताधिक्य मिळविले होते.

जयश्री पलांडे यांनी देखील शिरूरमधून दोनवेळा नशीब आजमावले होते. तर प्रदीप कंद यांच्याकडे शिरूरचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा आहे. तर हडपसरमधून टिळेकर हे एकदा विजयी झाले होते. मात्र २०१९ मध्ये ते पराभूत झाल्याने आगामी निवडणुकीसाठी त्यांचे नाव पुन्हा चर्चेत आहे.

महाविकास आघाडी एकत्रित लढणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले असल्याने शिरूर लोकसभा मतदार संघात शिवसेनेचा एकही आमदार नाही. यामुळे सर्व ठिकाणी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असल्याने शिवसेना (ठाकरे गट) आणि शिंदे गटात दोन्हीकडे अस्वस्थता वाढली आहे. यामध्ये जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे हे संभाव्य उमेदवारीने शिंदे गटात दाखल झाले.

BJP
BJP News : अकोला भाजपमध्ये अध्यक्षपदाच्या खांदेपालटाचे वारे वेगात

मात्र त्यांना आशा बुचके यांच्याशी तडजोड करावी लागण्याची शक्यता आहे. आंबेगावमध्ये जयश्री पलांडे या दावेदार आहेत. तर खेडमध्ये अतुल देशमुख यांनी दावा केल्याने शिंदे गट शांत आहे. शिरूर हा पारंपरिक भाजपचा मतदारसंघ असल्याने या ठिकाणी शिंदे गट आणि भाजपत संघर्षाची शक्यता कमी आहे. तर हडपसर मध्ये शिंदे गटाचे नाना भानगिरे यांनी उमेदवारीचा दावा केल्याने हडपसरमध्ये भानगिरे आणि टिळेकर यांच्यात संघर्षाची शक्यता आहे.

‘शिरूर’ची जबाबदारी आमदार लांडगे यांच्याकडे

शिरूर लोकसभेच्या प्रमुखपदी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची नियुक्ती केली आहे. यामुळे शिरूरचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांची चर्चा आहे. मात्र शिरूरमध्ये शिवसेना (शिंदे) गट आणि भाजप एकत्रित लढणार असल्याची देखील चर्चा असून, या ठिकाणी शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी देखील अंतिम मानली जात आहे. तर महेश लांडगे हे राज्यात मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याने आढळराव पाटील यांचे टेन्शन काही प्रमाणात कमी झाल्याची चर्चा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com