Wild Vegetables
Wild Vegetables Agrowon

Wild Vegetable : रानभाज्या हा निसर्गातील एक मोठा ठेवा

Latest Agriculture News : रानभाजी हा निसर्गातील एक मोठा ठेवा आहे. त्याचा आस्वाद प्रत्येकानेच घ्यायला हवा, असे प्रतिपादन तहसीलदार राहूल तायडे यांनी केले.
Published on

Akola News : रानभाजी हा निसर्गातील एक मोठा ठेवा आहे. त्याचा आस्वाद प्रत्येकानेच घ्यायला हवा, असे प्रतिपादन तहसीलदार राहूल तायडे यांनी केले. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून रानभाजी महोत्सव प्रत्येक तालुक्यांमध्ये आयोजित करण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने बाळापूर येथे सुद्धा रानभाज्यांचा महोत्सव शुक्रवारी (ता. ११) तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या परिसरात झाला. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन पंचायत समिती सभापती शारदाताई सोनटक्के यांनी केले.

Wild Vegetables
Wild Vegetable : आरोग्यदायी रानभाज्या

कार्यक्रमाला तहसीलदार राहुल तायडे, जिल्हा परिषद सदस्या प्रगतीताई दांदळे, मीनाताई बावणे, पंचायत समिती सदस्य जी. पी. उगले, एल. के. डोंगरे, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय काळे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विजय शेगोकार, मंडळ कृषी अधिकारी शिवाजी जाधव, महिला बालविकास अधिकारी भारती लांडे, कृषी विस्तार अधिकारी जी. पी. नाकट, बाजार समिती संचालक रमेश ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते गजानन दांदळे, बाळूभाऊ हिरेकर, रामकृष्ण सोनटक्के यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

महोत्सवामध्ये मान्यवरांनी प्रत्येक दालनाला भेट देऊन उपस्थित शेतकऱ्यांकडून व गटाकडून रानभाज्यांविषयी माहिती घेतली. मुख्य कार्यक्रमात राहुल तायडे यांच्यासह, शारदाताई सोनटक्के, प्रगतीताई दांदळे यांनी मार्गदर्शन केले. बाजारातील त्याच त्या भाज्या खाण्यापेक्षा अतिशय चविष्ट व औषधी गुणधर्म असणाऱ्या रानभाज्या खाणे हे कधीही चांगले, असे आवाहन केले.

Wild Vegetables
Wild Vegetables : ‘रानभाजीचा नैसर्गिक वारसा जतन करा’

या वेळी मान्यवरांच्या हस्ते सहभागी गटांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय शेगोकार यांनी केले. तर आभार मंडळ कृषी अधिकारी शिवाजी जाधव यांनी मानले.

महोत्सवात २८ हून अधिक रानभाज्या

महोत्सवात करटोली, चिवय, आघाडा, पाथरी, अंबाडी, केणा, करवंद, चमकुराची पाने, फांदीची भाजी, तरोटा, आंबटचुका, वाघाटे, गवत्ती चहा, गोबरुकंद, तांदुळजा, सुरणकंद, कुर्डू, गुळवेल, शेवगा, कुंजीर, शेरणी, मुंगटी, पुदिना, कपाळफोडी, खापरफुटी, मटार, पाथरी, दंडोळे आदी रानभाज्यांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com