Farmer Diwali : शेतकऱ्यांच्या समस्यांवर ठोस उपाय कधी शोधणार ?

परतीच्या पावसाने (Rain) धिंगाणा घातला. पिकं (Crop) सडली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतला. प्रचंड नुकसान झालं आहे. आधीच दारिद्र्यात खितपत पडलेली हजारो शेतकरी कुटुंबं देशोधडीला लागली आहेत.
Agrowon Problem
Agrowon ProblemAgrowon

परतीच्या पावसाने (Rain) धिंगाणा घातला. पिकं (Crop) सडली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतला. प्रचंड नुकसान झालं आहे. आधीच दारिद्र्यात खितपत पडलेली हजारो शेतकरी कुटुंबं देशोधडीला लागली आहेत.

तोट्याच्या चिखलात त्यांची पावलं रुतन बसलेली आहेत. दिवाळीसारखे सण साजरे करणे त्यांच्यासाठी अशक्यप्राय होऊन बसले आहे, हे खरे आहे. माध्यमात येणाऱ्या बातम्या बघून, वाचून मन विषण्ण होतं.

मध्यमवर्गीय किंवा चांगली आर्थिक स्थिती असलेल्यांना शेतकऱ्यांची दिवाळी बरी व्हावी त्यासाठी काहीतरी करावंसं वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे. ते आवश्यकही आहे. औचित्य नाकारण्यात अर्थ नाही.

Agrowon Problem
Cotton Rate : कापूस बाजाराला उभारी मिळण्याची शक्यता

मात्र पिकं हातातून गेल्यामुळे शेतकऱ्यांचा खरा संघर्ष पुढंच आहे. ज्या शेतकरी कुटुंबातील मुलं मुली उच्च शिक्षण घ्यायला पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये आहेत. त्यांच्या दुसऱ्या सत्रातल्या फिया भरणे, प्रवासखर्च भागवणे, खानावळीचे पैसे भरणे, हॉस्टेल किंवा रूम्ससाठी येणारा खर्च भागवणे... यासाठी शेतकऱ्यांच्या हातात पैसेच नाहीत.

ज्या पिकांवर भिस्त होती ती कधीच नष्ट झाली आहेत. तोट्याच्या गाळात शेती रुतलेल्या शेतकरी आई बापांना मुलांचे शिक्षण अशक्य होऊन बसणार आहे. यात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींचं शिक्षण थांबायची शक्यता अधिक दिसते.

आर्थिक मदत करायची असल्यास दिवाळीसाठी कराच पण आपला पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण थांबू नये यासाठी ठोस काहीतरी करता आलं तर मोठं काम होईल. सगळ्यांना आपण पुरे पडणार नाही आहोत, याची नम्र जाणीव आहेच.

कोणाला, किती, कशी मदत करायची यासाठी नियोजन करायला लागेल. काहीतरी फ्रेमवर्क तयार करायला लागेल. मला याची जाणीव आहे की हे काम एकट्या-दुकट्याचे नाही. सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत. मात्र कोरडी हळहळ व्यक्त करणाऱ्या मनांना कृतिशील बनवून हे काम करणं फार आवश्यक आहे. ही काळाची मागणी आहे.

Agrowon Problem
Pomegranate Rate : सोलापुरात डाळिंबाच्या आवकेत घट, दर वधारले

यातून गरीब शेतकऱ्यांच्या होतकरू मुलांच्या शिक्षणासाठी काम उभं राहू शकतं. गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाल्याने मुलांचं आणि आईबापाचं आयुष्य बदलू शकतं.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com