Agriculture Education : शालेय अभ्यासक्रमात शेतीसोबत हवे जलसंधारणही

Water Conservation : तासमवाडा गावात करण्यात आलेल्या शास्त्रोक्‍त उपचाराच्या परिणामी खऱ्या अर्थाने हे गाव जलसमृद्ध झाले आहे. गावात एक हेक्‍टर रब्बी क्षेत्र नसताना रब्बी पिकांच्या माध्यमातून दुबार पिकाची सोय झाली.
Water Conservation
Water ConservationAgrowon

Wardha News : शालेय अभ्यासक्रमात शेतीचा अंतर्भाव करण्याचा आग्रह होत असला, तरी भविष्य सुरक्षित करावयाचे असल्यास शेतीसोबतच जलसंधारण आणि संवर्धन या घटकाचा देखील अभ्यासक्रमात समावेश होण्याची गरज असल्याचे मत वर्धा येथील ज्येष्ठ जलसेवक माधव कोटस्थाने यांनी ‘ॲग्रोवन’सोबत संवाद साधताना व्यक्‍त केले.

श्री. कोटस्थाने म्हणाले, की भारतातील ८२ टक्‍के क्षेत्र कोरडवाहू व पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. ज्याला कुठल्याही सिंचन प्रकल्पाचा लाभ होत नाही. अशा या कोरडवाहू क्षेत्रासाठी वर्धा जिल्ह्यातील तामसवाडा पॅटर्न हे मॉडेल विकसित करण्यात आले आहे. तासमवाडा गावात करण्यात आलेल्या शास्त्रोक्‍त उपचाराच्या परिणामी खऱ्या अर्थाने हे गाव जलसमृद्ध झाले आहे.

Water Conservation
Water Conservation : जलक्रांतीतून संपन्नतेच्या वाटेवर...

गावात एक हेक्‍टर रब्बी क्षेत्र नसताना रब्बी पिकांच्या माध्यमातून दुबार पिकाची सोय झाली. खरीप पिकाला संरक्षित पाणी मिळत असल्याने त्याची उत्पादकता वाढली. तत्कालीन केंद्रीय जलसंपदा राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी तामसवाडा प्रकल्पाला भेट दिली. त्यासोबतच तामसवाडा प्रकल्पावर या पुस्तिकेत विशेष उल्लेख करण्यात आला असून तामसवाडा (टीपी) पॅटर्न म्हणून याला मान्यता देण्यात आली.

Water Conservation
Agriculture Education : शिकूनच करावी लागेल शेती

पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेला या कामासाठी २०२० मध्ये ग्लोबल अवार्ड मिळाला. ऑस्ट्रेलियाचे जलसंपदामंत्री व भारतीय राजदूत यांची या सोहळ्याला ऑनलाइन पद्धतीने उपस्थिती होती. भूजल आणि भूपृष्ठीय साठा या दोन्हीत वाढ झाल्याने या गावामध्ये संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे.

अशा प्रकारच्या अनेक मॉडेलवर सध्या वर्धा, नागपूर जिल्ह्यात काम सुरू आहे. त्यांचे अनुकरण देश आणि राज्य पातळीवर होण्याची गरज आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात जलसंवर्धन विषयक उपचार व उपायांवर भर देण्यात आल्याचे कोटस्थाने यांनी सांगितले.

आपण आज मंगळासह इतर ग्रहांवर पाण्याचा आणि सजीव सृष्टीचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. मात्र पृथ्वीवर उपलब्ध जलस्रोतांचे संरक्षण आणि संवर्धनाकडे दुर्लक्ष होत आहे. पडणाऱ्या पावसाचे पाणी अडविण्यासाठी देखील काहीच होत नाही. पाण्याचे महत्त्व भावी पिढीला लहानपणीच कळले पाहिजे. त्याकरिता अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश होण्याची गरज आहे.
- माधव कोटस्थाने, ज्येष्ठ जलसेवक, वर्धा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com