Solapur News : सोलापुरात कचरामुक्त गाव अभियान राबविणार

Clean India Movement : सोलापूर जिल्ह्यात येत्या सोमवारपासून (ता. १५) १५ ऑगस्टपर्यंत साधारण तीन महिने कचरामुक्त गाव ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.
Swachh Bharat Mission
Swachh Bharat MissionAgrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात येत्या सोमवारपासून (ता. १५) १५ ऑगस्टपर्यंत साधारण तीन महिने कचरामुक्त गाव ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व तालुक्यांना या अभियानासाठी पूर्वतयारी करून घेण्याची सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी केली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी या अभियानासाठी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्पाधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी यासंबंधीची सूचना केली.

Swachh Bharat Mission
Swachh Bharat Mission : वाशीम जिल्ह्यात ‘शाश्‍वत स्वच्छ गाव पुरस्कार योजना’

उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादिन शेळकंदे, शिक्षणाधिकारी जावेद शेख, कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सचिन सोनकांबळे, शिक्षण समन्वयक शंकर बंडगर, संनियंत्रण सल्लागार यशवंती धत्तुरे, घनकचरा सल्लागार मुकुंद आकुडे, संवाद सल्लागार सचिन सोनवणे, सांडपाणी तज्ज्ञ प्रशांत दबडे, क्षमता बांधणी तज्ज्ञ महादेव शिंदे या वेळी उपस्थित होते.

Swachh Bharat Mission
Swachh Bharat Abhiyan : स्वच्छ भारत अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप

श्री. स्वामी म्हणाले, की सोलापूर जिल्हा हा तीर्थक्षेत्रांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पंढरपूर येथे भाविकांची वर्दळ सातत्याने असते, सोलापूरचे वेगळे महत्त्व आहे, हे लक्षात घेऊन काम व्हायला हवे.

पंढरपुरात नमामि चंद्रभागा अभियान राबवले जात आहे. जिल्ह्यातील नदीकाठाबरोबरच इतर गावांमध्येही स्वच्छतेचे महत्त्व जाणून काम व्हायला हवे. त्यात सातत्य टिकवून, गाव कचरामुक्त करणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.

अभियानातील ठळक कामे

  • या अभियानाच्या तीन महिन्यांच्या कालावधीत गावनिहाय नेमणार पालक अधिकारी.

  • तालुकास्तरावरील बैठकीतून कचरामुक्त गावची देणार माहिती.

  • नदीकाठच्या ग्रामपंचायतीसाठी करणार स्वतंत्र आराखडा.

  • ओडीएफमधील मॅाडेल ग्रामपंचायतीचा पण असणार समावेश.

  • आषाढी यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर पालखी मार्गावर व्यापक जनजागृती.

  • गावपातळीवरील कामांचा घेतला जाणारा साप्ताहिक आढावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com