MGNREGA : राज्यात ‘रोहयो’ कामांवरील मजुरीत १७ रुपयांनी वाढ

एक एप्रिलपासून दिवसाला मिळणार २७३ रुपये
MANREGA
MANREGA Agrowon

सूर्यकांत नेटके ः अॅग्रोवन वृत्तसेवा
नगर ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme) (मगांराग्रारोहयो) कामावर काम करणाऱ्या मजुरांना आतापर्यंत दर दिवसाला २५६ रुपये मजुरी मिळत होती.

त्यात यंदा सतरा रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे ‘मगांराग्रारोहयो’च्या कामावर काम करणाऱ्या मजुरांना आता दर दिवसाला २७३ रुपये मिळणार आहेत.

केंद्र सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाने काढलेल्या अधिसूचनेनुसार शासनाने नव्याने आदेश काढले आहेत.

ग्रामीण भागात मजुरांना रोजगार मिळावा आणि विकास कामालाही चालना मिळावी यासाठी केंद्र सरकार ‘मगांराग्रारोहयो’तून विविध कामे करून घेते.

विशेषतः फळबाग लागवड, शेततलाव व अन्य शेतीविकासाची कामे, वैयक्तिक लाभाच्या योजनांचाही यातून लाभ दिला जातो.

‘शंभर दिवस रोजगार’ असे या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. जॉबकार्डची नोंदणी असलेल्या शेतकरी, शेतमजुरांना या योजनेतून काम उपलब्ध करून दिले जाते आहे.

MANREGA
‘अमूल’कडून दूध विक्रीदरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ 

आतापर्यंत राज्यात मजुरांना ‘मगांराग्रारोहयो’च्या कामांवर प्रतिदिन २५६ रुपये मोबदला दिला जात होता. त्यात यंदा १७ रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे राज्यात ‘मगांराग्रारोहयो’च्या कामावर मजुरांना प्रतिदिन २७३ रुपये मोबदला मिळेल.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार १ एप्रिलपासून राज्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना या दरानुसार मजुरी हजेरीपत्रक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


दरम्यान, सध्या वाढती महागाई पाहता मजुरीत झालेली वाढ पुरेशी नाही, असे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

सिक्कीमच्या तीन ग्रामपंचायतीत सर्वाधिक मजुरी
‘मगांराग्रारोहयो’च्या कामावर काम करणाऱ्या मजुरांसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार सिक्कीम राज्यातील तीन ग्रामपंचायतींच्या हद्दीत कामांवर मजुरांना प्रतिदिन ३५४ रुपये मजुरी मिळेल. बाकी सिक्कीम राज्यात अन्य ठिकाणी २५४ रुपये मजुरी असेल.

MANREGA
Orchards Plantation : राज्यात पस्तीस हजार हेक्टरवर ‘रोहयो’तून फळबाग लागवड

नव्या दरानुसार राज्यनिहाय मजुरी
राज्य... प्रतिदिन मजुरी (रुपये)
सिक्कीम...३५४
केरळ...३३३
कर्नाटक...३१६
लक्षद्वीप...३०४
पंजाब...३०३
दीव-दमण (केंद्रशासित प्रदेश)...२९७
पुद्दुचेरी (केंद्रशासित प्रदेश)...२९४
तमिळनाडू...२९४
महाराष्ट्र...२७३
तेलंगणा...२७२
मध्य प्रदेश...२२१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com