MP APMC : भाजीपाला वाहतूकदारांना मध्य प्रदेशात मारहाण, वाहनांची तोडफोड

MP news : राज्यातून मध्य प्रदेशात भाजीपाला व फळभाज्या वाहतूक करणाऱ्या अनेक वाहनांची तोडफोड झाली.आजवर चोरट्यांच्या मारहाणीत पाच जण जखमी झाले.
truck
truckAgrowon
Published on
Updated on

Nashik news : राज्यातून मध्य प्रदेशात भाजीपाला व फळभाज्या वाहतूक करणाऱ्या पिकअप चालकांची मध्य प्रदेशात अडवणूक करण्यात येत आहे. सोयीच्या मार्गाने गेल्यास परिवहन अधिकारी, कर्मचारी अडवणूक करतात. तीस किलोमीटरचा फेरा घेत गेल्यास चोर, दरोडेखोरांची भीती आहे. आजवर चोरट्यांच्या मारहाणीत पाच जण जखमी झाले. अनेक वाहनांची तोडफोड झाली. यामुळे चालकांची स्थिती ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’ अशी झाली आहे.

truck
Mumbai Vegetable Market : पावसामुळे भाजीपाला मार्केटवर थेट परिणाम, तब्बल ९० हजार पालेभाज्या जुड्या फेकल्या

नाशिक जिल्ह्यातील दीडशेहून अधिक पिकअपचालक मध्य प्रदेशात शेतमाल वाहतूक करतात. यात ७३ पिकअप मालेगावातील ६० हून अधिक पिकअप नाशिक येथील, तर बागलाण, कळवण, मनमाड, उमराणे, धुळे येथील वाहने आहेत. राज्याची सीमा ओलांडताच बडवाणी जिल्ह्यापासूनच अडवणूक सुरू होते. महाराष्ट्रातील वाहन दिसताच परिवहनचे अधिकारी बेकायदेशीररीत्या १५ ते २० हजारांची मागणी करतात. पैसे देऊनही रीतसर पावती दिली जात नाही. पावती मागितल्यास शिवीगाळ, मारहाण केली जाते. प्रसंगी तासनतास थांबवून ठेवण्यात आल्याने भाजीपाला वेळेत पोहोच होत नाही. शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.

शहर व परिसरातील पिकअपचालक नजीकचा मार्ग असलेल्या सेंधवा पलसुद राजपूर या भागातून जातात. या मार्गावर महिला परिवहन अधिकारी, कर्मचारी परराज्यातील गाडी पाहताच अडवणूक करतात. पावती न देता पैसे घेतात. मध्य प्रदेश सीमेवरून टीपी कर भरून सरळ मार्गाने जा. इकडून यायचे नाही, अशी दमबाजी होते. परिवहन अधिकाऱ्यांच्या जाच व त्रासाला कंटाळून पिकअपचालक ३० किलोमीटरचा फेरा मारुन जुलवानिया राजपूर दाहोद मार्गे गेल्यास या मार्गावर चोर, दरोडेखोरांचा त्रास आहे. चोरटे रस्त्यात अडवून लूट करतात.

truck
पुणे बाजार समिती देणार मार्केट इंटेलिजन्स : प्रशासक मधुकांत गरड

पैसे, मोबाइल, दागिने हिसकावून रोख रकमेची मागणी करतात. पैसे न दिल्यास गाडीच्या काचा फोडून जबर मारहाण करतात. गेल्या अनेक महिन्यांपासून हा त्रास सुरू आहे. अनेकांनी कर्ज काढून वाहने घेतली आहेत. उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नसल्याने बिकट परिस्थिती झाली आहे. यावर उपाययोजना करावी. मध्य प्रदेश परिवहन विभाग व पोलिसांशी समन्वय साधून या त्रासातून मुक्त करावे, असे साकडे भाजीपाला वाहतूक पिकअप चालक संघटनेने पालकमंत्री दादा भुसे यांना घातले आहे. ५० हून अधिक पिकअप चालकांनी श्री. भुसे यांना आपबिती सांगितली. दोन दिवसांपूर्वीही चोरट्यांनी एका पिकअपच्या काचा फोडल्याचे सांगितले. शिष्टमंडळात ज्ञानेश्वर कांदळे, दादा केदार, वसंत उशिरे, सुशिल पाटील, रवी बोरसे आदींचा समावेश होता.

 ‘...तर मध्य प्रदेशातील वाहनांचा प्रवेश रोखू’

मध्य प्रदेशात चोर व दरोडेखोरांनी केलेल्या मारहाण व लुटीत आजवर कार्तिक गोसावी (कौळाणे), समाधान पवार, शुभम मान (सोयगाव) हे तिघे वाहनचालक जबर जखमी झाले. परिवहन अधिकारी पलसूदला गाडी पकडून सेंधवा, जुलवानिया सीमेवर नेतात. रात्री बाराला गाडी जमा केल्यावर दंड भरून दुपारी बाराला सोडण्यात येते. दंड पावती देत नाहीत. शेतीमाल खराब होतो. कार्तिक तर मरणाच्या दाढेतून परत आला. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत त्याचे संपूर्ण तोंड फुटले. तीन ते चार लाख रुपये खर्च करूनही अद्याप त्याला जेवण करता येत नाही. पेय पदार्थावरच तो आहे. आजवर दहा ते बारा वाहनांची तोडफोड झाली. हा त्रास कमी न झाल्यास मध्यप्रदेशातील वाहनांना आम्ही जिल्ह्यात प्रवेशही करू देणार नाही, असा इशारा भाजीपाला वाहतूक पिकअप संघटनेचे अध्यक्ष नंदराज सूर्यवंशी यांनी दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com