Kvk : कृषी विज्ञान केंद्रात शेडनेटमधील भाजीपाला, बीजोत्पादन प्रशिक्षण

षी विज्ञान केंद्र खरपुडी येथे नुकतेच चारदिवसीय ग्रामीण युवक आणि युवतींसाठी शेडनेटमधील भाजीपाला व भाजीपाला बीजोत्पादन या विषयावर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडले.
Kvk
Kvk Agrowon

जालना : कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथे नुकतेच चारदिवसीय ग्रामीण युवक आणि युवतींसाठी शेडनेटमधील (shadenet ) भाजीपाला व भाजीपाला बीजोत्पादन (Vegetable, seed production training) या विषयावर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडले. प्रशिक्षणाच्या उद्‌घाटन प्रसंगी शिवणी येथील प्रयोगशील शेतकरी उद्धवराव खेडेकर, कृषी विज्ञान केंद्राचे कृषी अभियंता पंडित वासरे तसेच वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने यांची प्रमुख उपस्थिती होती.

Kvk
खरपुडी कृषी विज्ञान केंद्र राबविणार बीजोत्पादन कार्यक्रम

पहिल्या दिवशी शेडनेट मधील महत्त्वाच्या भाजीपाला पिकांची लागवड या विषयावर प्राध्यापक सुनील कळम यांनी मार्गदर्शन केले. यानंतर शेडनेटचे महत्त्व, उभारणी व खर्च तसेच शेटनेट मधील भाजीपाला पिकांचे पाणी व्यवस्थापन या विषयावर कृषी अभियंता पंडित वासरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. शेडनेटमधील माती निर्जंतुकीकरण व बेड तयार करणे तसेच शेडनेटमधील भाजीपाला अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावर मृद्‍शास्त्रज्ञ प्रा. राहुल चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

दुसऱ्या दिवशी जालना तालुक्यातील वाघरूळ व पोखरी गावातील शेडनेट मधील भाजीपाला व भाजीपाला बीजोत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेडनेटला भेटी देऊन भाजीपाला लागवड व भाजीपाला बीजोत्पादन तंत्रज्ञानाबद्दल प्रशिक्षणार्थ्यांनी शेतकऱ्यांकडून माहिती समजून घेतली. प्रशिक्षणाच्या तिसऱ्या दिवशी शेडनेटमधील प्रमुख भाजीपाला बीजोत्पादनाविषयी माहिती प्रा. सुनील कळम यांनी दिली. शेडनेटमधील भाजीपाला पिकांच्या कीड व रोग व्यवस्थापनाबद्दल प्रा. अजय मिटकरी यांनी सविस्तर माहिती दिली. यानंतर शेडनेटमधील भाजीपाला काढणी, हाताळणी, प्रतवारी व विक्री व्यवस्थापनाबद्दल अन्नतंत्रज्ञ प्रा. शशिकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. नंतर कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून हिवर्डी, ता.जि. जालना येथील प्रगतिशील शेतकरी, तसेच भाजीपाला उत्पादक पुंजाराम भुतेकर यांनी आपण १९९९ पासून कृषी विज्ञान केंद्राच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली कशाप्रकारे आपल्या भाजीपाला उत्पादनामध्ये ठसा उमटवला याबद्दल आपले अनुभव कथन केले. या प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी शेडनेट योजनेविषयी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी राम रोडगे यांनी दिली.

त्यानंतर शेती व्यवसायात ग्रामीण युवकांचे उद्योजकीय गुण याबद्दल प्रोत्साहनपर मार्गदर्शन निवृत्त उपप्राचार्य बी. वाय. कुलकर्णी यांनी केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख व प्रमुख डॉ. श्रीकृष्ण सोनुने, कृषी अभियंता पंडित वासरे तसेच प्रा. बी. वाय. कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com