Tomato Rate : टॅटू काढा अन् मिळवा एक किलो टोमॅटो फ्री, कोण काढलीय ही भन्नाट आयडिया?

Varanasi Tattoo Shop : देशात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. या पार्श्वभूमीवर, वाराणसीतील एका टॅटू शॉपच्या मालकाने अनोखी शक्कल लढवली आहे.
Tomato Rate
Tomato Rateagrowon

Varanasi Tattoo Shop : देशात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. या पार्श्वभूमीवर, वाराणसीतील एका टॅटू शॉपच्या मालकाने अनोखी शक्कल लढवली आहे. त्याच्या दुकानात टॅटू काढणाऱ्या प्रत्येकाला तो एक किलो टोमॅटो मोफत देत आहे. त्याच्या या ऑफरमुळे शहरवासीयांत चर्चेचा विषय ठरला आहे. मुख्य म्हणजे टॅटू काढून घेण्यासाठी त्याच्या दुकानात ग्राहकांची मोठी गर्दी होत असल्याचे प्रत्यक्ष शॉप मालकाने माहिती दिली.

वाराणसीच्या सिगरा भागात असलेल्या टॅटू शॉपचे मालक अशोक गोगिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, टोमॅटोच्या किमती सतत वाढत असल्याने त्यांनी संधीचा सर्वाधिक फायदा घेत असल्याचे सांगितलं.

दरम्यान ग्राहक खुशबू वर्मा हे नेहमीच या ठिकाणी टॅटू काढून घेण्यासाठी येतात. रविवारी त्यांनी हातावर टॅटू काढून घेतला तेव्हा त्यांना एक किलो टोमॅटो भेट मिळाले. यावेळी त्यांना सुखद धक्का बसल्याची माहिती वर्मा यांनी दिली.

सिगरा भागात असलेल्या टॅटू शॉपचे मालक अशोक गोगिया म्हणाले की, टोमॅटोच्या किमती सतत वाढत असल्याने मी या संधीचा लाभ घ्यायचे ठरवले. अर्थात, जोपर्यंत टोमॅटोच्या किमती खाली येत नाहीत, तोपर्यंतच ही योजना राबविणार असल्याटी माहिती त्यांनी दिली.

Tomato Rate
Tomato Market : ‘नाफेड’मार्फत टोमॅटो खरेदीचा शेतकरी संघटनेकडून निषेध

याचबरोबर आणखी एका ग्राहकाने दिलेल्या माहितीनुसार, ही ऑफर एक चांगली कल्पना आहे याचबरोबर मी याची लाभार्थी झाल्याने मला खूपच आनंद झाला आहे.

टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे या ऑफरबद्दल मी खूपच आनंदी आहे. या ऑफरची माहिती मी सर्वांना देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

दुकानदार अशोक गोगिया यांनी, या ऑफरमुळे त्यांचा व्यवसाय नफ्यात आला आहे. भारतातील अशा प्रकारची पहिलीच योजना आहे आणि तिला समाधानकारक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती दुकानमालकाने दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com