Amravati News : मेळघाटातील जंगलात विविध प्रकारची हळद नैसर्गिकरीत्या उपलब्ध आहे. यातील काही हळदीचे वाण विविध आजारांवर गुणकारी, तर काही वाण विषारी आहेत. त्यातील उपचारास योग्य हळद वाणांचा संग्रह आणि रोपनिर्मिती जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रामचरण खडके यांनी केला आहे. रानटी हळदीचे हे वाण पशू आणि माणसांवर उपचार करण्यास योग्य दिसून आले आहेत, असा त्यांचा दावा आहे.
गेल्या काही वर्षांत मेळघाटात पशुपालन आणि त्यावर आधारित प्रक्रिया उत्पादनातून अर्थकारण गतिमान झाले आहे. या भागातील गवळी समाज पशुपालनावर अवलंबून आहे. या भागातील रामचरण खडके यांना बालपणी आजोबांसोबत जंगलात जनावरे चारताना लाळ्या खुरकूत, पोटफुगी होणे, दूध उत्पादनाच्या समस्येवर कोणती वनस्पती गुणकारी औषध म्हणून कार्य करते, याविषयी माहिती मिळत गेली. डीएडला असताना जनावरे चारताना अचानक रामचरण खडके यांच्यावर अस्वलाने हल्ला करून हाताला चावा घेतला.
तेव्हा डॉक्टरांनी हात कापण्याचा सल्ला दिला असता त्यांच्या आजोबांनी विविध वनौषधींचा वापर करून त्यांचा हात वाचविला. तेव्हापासून रामचरण खडके यांना वनौषधीचा अभ्यास करण्याचा छंद जडला. आजोबांच्या बटव्यापासून ते अग्निपुराणात उल्लेखलेल्या दिव्य औषधींचा त्यांनी अभ्यास केला.
या अभ्यासातून त्यांनी जंगलात आढळणाऱ्या विविध रानहळदीच्या वाणांचे संकलन केले आहे. याचबरोबरीने लक्ष्मण, कांडवेल, शतावरी, मिरचीकंद, शमी, टेटू आदी वनस्पतींबाबत त्यांचा अभ्यास आहे. त्यांचा वापर पशू आणि मानवी आजारावर उपचारासाठी करता येतो, असे ते सांगतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.