Unseasonal Rain : पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांत अवकाळी पावसाची हजेरी

गेले तीन-चार दिवसांत प्रचंड उकाडा वाढला होता. मात्र गुरुवारी (ता. १३) सायंकाळी हवेली, मुळशी, भोर, पुरंदर, दौंड तालुक्यांत काही ठिकाणी अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Pune News गेले तीन-चार दिवसांत प्रचंड उकाडा वाढला होता. मात्र गुरुवारी (ता. १३) सायंकाळी हवेली, मुळशी, भोर, पुरंदर, दौंड तालुक्यांत काही ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) अचानक हजेरी लावली.

जोरदार विजांचा कडकडाटासह अर्धा तास जोरदार पाऊस कोसळला. आकाशात काळ्याकुट्ट ढगांनी गर्दी करीत अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे ज्वारी, बाजरी, कांदा पीक आणि कडधान्य या उभ्या पिकाचे नुकसान (Crop Damage) झाले आहे.

मागील काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होत असून, उन्हाच्या छळा तीव्र झाल्या आहेत. तसेच दिवसभर उन्हाचा चटका, पहाटे थंडी असे वातावरण निर्माण होत होते. दरम्यान गुरुवारी सायंकाळी ४ नंतर वातावरणात अचानक बदल होऊन, आकाशात ढग दाटून आले होते.

Crop Damage
Crop Damage In Solapur : सोलापुरात ‘वादळी’ने २६ गावातील १११.४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान

सायंकाळी ७.४५ दरम्यान, अवकाळी पावसांच्या हलक्या ते मध्यम स्वरूपांच्या सरी कोसळल्याने वाल्हे व परिसरातील शेतकरीवर्ग अचानक पडलेल्या या अवकाळी पावसाने बळीराजाची चिंता वाढली आहे.

Crop Damage
Crop Damage Compensation : नुकसानग्रस्तांच्या मदतीचे वितरण आता मंत्रालयातून

अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. पुणे शहर व उपनगर कोथरूड, बावधन, पाषाण, पौंड रोड, गोखले नगर, सेनापती बापट या भागात झाडपडीच्या घटना घडल्या. तर काही ठिकाणी वीज खंडित झाली होती. खराडी, वाघोली, केसनंद या भागांतही हलक्या सरी पडल्या.

भोर तालुक्यातील नसरापूर, कापूरहोळ, कामथडी, कासुर्डी, सारोळा परिसरांत ज्वारी आणि कांदा काढण्याची कामे प्रगतिपथावर होती. कांद्याची ढिगारे या पावसामुळे भिजून गेले.

जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी विजेचे खांब कोलमडले तर काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. वीज कामगार पावसातही वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत होते.

पुरंदरमधील वाल्हे परिसरातील, दौंडज, पिसुर्टी, वागदरवाडी, आडाचीवाडी, सुकलवाडी, जेऊर, हरणी, पिंगोरी, कामठवाडी आदी परिसरात अवकाळीच्या सरी कोसळल्या. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जाईल.

तसेच शेतातील उभ्या पिकांना फटकाही बसून, उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. या अवकाळीमुळे कांदा, तसेच काही प्रमाणात काढणीचा राहिलेले गहू, ज्वारी, हरभरा, मका आदी पिकांवर परिणाम होणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com