Milk Rate : गुणप्रतीच्या नावाखाली दूधदरात लूट

उत्पादक शेतकऱ्यांना दर परवडेना; पशुखाद्याच्या वाढलेल्या दराने वाढविली चिंता
milk
milkAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा

सोलापूर ः शासनाने गाईच्या दुधाला प्रतिलिटर ३४ रुपये खरेदी दर जाहीर करूनही प्रत्यक्षात गुणप्रतीच्या नावाखाली रिव्हर्स पॉइंटमुळे दूध उत्पादकांना दुधाला प्रतिलिटर आठ ते नऊ रुपयांची तूट सोसावी लागत आहे. परिणामी, प्रत्यक्षात दुधाला प्रतिलिटर २५ ते २६ रुपये दर मिळत आहे. एकीकडे पशुखाद्याचे वाढलेले दर आणि दुसरीकडे दुधाला मिळणारा कमी दर यातून खर्चाचा मेळ घालण्यासाठी दूध उत्पादकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

कोल्हापूर, नगर नंतर सोलापूर हा दूध उत्पादनातील आघाडीवरचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सोलापूर जिल्हा दूध संघ आणि अकलूजचा शिवामृत दूध संघ या दोन सहकारी दूध संघासह राज्यातील आणि परराज्यांतील खासगी जवळपास आठ ते नऊ खासगी डेअऱ्या, संघ जिल्ह्यातील दुधाचे संकलन करतात. विशेषतः पंढरपूर, माळशिरस, माढा, मंगळवेढा, मोहोळ आणि माळशिरस या भागात दुधाचे उत्पादन सर्वाधिक होते. सध्या सोलापूर जिल्ह्यात निव्वळ गाईचे दूध १८ लाख लिटरपर्यंत संकलन होते आहे. तर म्हशीचे २ लाख लिटर संकलन होते, याप्रमाणे एकूण सुमारे २० लाख लिटर दुधाचे संकलन आहे.

milk
Cow Milk Rate : गाईच्या दूधदरात घसरण सुरूच

राज्य शासनाने दुधाच्या ३.५ ते ८.५ गुणप्रतीच्या दुधाला प्रतिलिटरला ३४ रुपये दर जाहीर केला आहे. परंतु सध्या वातावरणामुळे दुधाची प्रत कमी मिळते आहे. तसेच अनेक भागात चाऱ्याची वाणवा आहे. परिणामी, ३-५ ते ८-५ या गुणप्रतीत दूध मिळत नाही. त्यामुळे गुणप्रतीत ३.४ ते ८.४ अशा रिव्हर्स पॉइंटने घसरण होते. नेमक्या याच घसरणीचा फायदा या खासगी डेअऱ्या, संघ घेत असून, एका पॉइंटला दीड रुपयाप्रमाणे दूध खरेदी दरात कपात केली जात आहे. त्यातूनच अनेक वेळा हा दर थेट २५ ते २६ रुपयांवर खाली जातो आहे. रिव्हर्स पॉइंटची पूर्वी हीच कपात प्रतिलिटरला केवळ २० पैसे होती. आता मात्र खासगी दूध संघ एका रिव्हर्स पॉइंटला सर्रास दीड रुपयापर्यंत कपात करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्रास लूट केल जात आहे.

हिरवा चारा मिळणे दुरापास्त

एकीकडे दुधाला कमी दर मिळत असल्यामुळे उत्पादक अडचणीत असताना, दुसरीकडे पशुखाद्याच्या दरवाढीनेही चिंता वाढली आहे. गतवर्षीच्या कडबा गंजी आता रिकाम्या झाल्या आहेत. तर हिरवा चारा मिळणे दुरापास्त झाले. पूर्वी ५० किलोच्या सुग्रासच्या बॅगेला १४०० रुपये दर होता. आता तो १६०० रुपयांवर आहे. मका भरडा ५० किलोच्या बॅगेला पूर्वी १२०० रुपये दर होता, आता तो १२५० रुपयांवर पोहोचला आहे. तर गहू भुश्शाच्या ५० किलोच्या बॅगेला पूर्वी ९०० रुपये दर होता, आता तो १२५० रुपयांपर्यंत गेला आहे.

संकलन केंद्रांचे कमिशनही घटले

जिल्हा दूध संघासह खासगी डेअऱ्यांची गावोगाव दूध संकलन केंद्रे आहेत. या केंद्रांना दूध संकलनापोटी हे संघ आणि डेअऱ्या प्रतिलिटरला एक ते दोन रुपये कमिशन देत होते. पण आता त्यांच्या कमिशनमध्येही कपात करण्यात आली आहे. जिल्हा दूध संघ पूर्वी प्रतिलिटरला एक रुपया देत होते, त्यांनी त्यात ५० पैसे कमी केले आहेत. तर काही खासगी संघ दोन रुपये देत होते, त्यांनीही त्यात ५० पैशाची कपात करत दीड रुपया कमिशन केले आहे.

याच वर्षी दूध व्यवसाय सुरू केला, एक ते सव्वा लाख रुपयांप्रमाणे एक अशा पाच गाई बाजारातून आणल्या. पण आता पश्चात्ताप होतो आहे, ३० लाखांचे कर्ज डोक्यावर झाले आहे. ते फेडायचे कसे, याची चिंता लागली आहे. शेतकऱ्यांचा विचार कधी होणार आहे का नाही.

- लंकेश पाटील,

दूध उत्पादक, पडसाळी, ता. उत्तर सोलापूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com