Sugarcane Verity : कोकणात उसाच्या दोन जाती ठरल्या सरस

कोकणातील वातावरणात कोएम- ०२६५ आणि को- ९२००५ या ऊस जाती पहिल्या निष्कर्षात सरस ठरल्या आहेत.
Sugarcane
SugarcaneAgrowon

सिंधुदुर्गनगरी ः कोकणातील वातावरणात कोएम- ०२६५ आणि को- ९२००५ या ऊस जाती (Sugarcane Verity) पहिल्या निष्कर्षात सरस ठरल्या आहेत. नापणे येथील ऊस संशोधन केंद्रामध्ये (Sugarcane Research Center) दहा एकरामध्ये उसाच्या आठ जातींची संशोधनासाठी लागवड (Sugarcane Cultivation) करण्यात आली आहे. त्यातून पहिल्या वर्षीचे निष्कर्ष हाती आले आहेत.

Sugarcane
Sugarcane Farming : कोकणात इंधनासाठी ऊस लागवड

कोकणातील ऊस लागवडीचा मागील तीन वर्षांचा आढावा घेतला असता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये एकरी केवळ १५ ते १६ टन उत्पादन मिळत आहे. कोकणातील वातावरण कोणत्या ऊस जातींना पोषक आहे, याचा अभ्यास होण्याची गरज होती.

त्यादृष्टीने नापणे येथील ऊस संशोधन केंद्रामध्ये २०२० पासून प्रकल्पाधिकारी डॉ. विजय शेट्ये यांचा गट ऊस जातींवर संशोधन करीत आहे. २०२० मध्ये संशोधन केंद्रामध्ये पहिल्या वर्षी विविध आठ जातींची दहा एकरांत लागवड करण्यात आली.

Sugarcane
Sugarcane Labor : मजुरांची दिवाळी उसाच्या फडात

खरेतर तीन वर्षांच्या निष्कर्षांनंतर उत्पादनाचा अंतिम आकडा काढता येणार असला तरी पहिल्या वर्षाच्या निष्कर्षात कोएम ०२६५ या जातीपासून हेक्टरी ८०.४६ टन आणि को ९२००५ या जातीपासून हेक्टरी ८०.४५ टन उत्पादन मिळाले आहे. या दोन जातीच्या तुलनेत इतर सहा जातींपासून खुपच कमी उत्पादन मिळाले. त्यामुळे पहिल्या निष्कर्षानुसार कोकणातील वातावरण या जातीसाठी पोषक मानले जात आहे. संशोधन केंद्राद्वारे पुढील दोन वर्षे उत्पादन वाढीसंदर्भात अभ्यास केला जाणार आहे.

- कोएम-०२६५ आणि को- ९२००५ या जाती उत्पादनात सरस.

- कोएम-०२६५ पासून हेक्टरी ८०.४६ टन उत्पादन

- को- ९२००५ पासून हेक्टरी ८०.४५ टन उत्पादन

- इतर सहा जातींपासून खूपच कमी उत्पादन

- आणखी दोन वर्षे होणार संशोधन

२०२० मध्ये उसाच्या विविध आठ जातींची लागवड ऊस संशोधन केंद्रामध्ये केली होती. पहिल्या वर्षी कोएम-०२६५ आणि को-९२००५ दोन जातींचे उत्पादन इतर जातीच्या तुलनेत चांगले आले. अजून दोन वर्ष आम्ही या जातीचे निरीक्षण करणार आहोत. त्यानंतर अंतिम निष्कर्ष काढला जाईल. या शिवाय अन्य काही बाबींवर देखील आमचे संशोधन सुरू आहे.
डॉ. विजय शेट्ये, प्रकल्प अधिकारी, ऊस संशोधन केंद्र, नापणे, जि. सिंधुदुर्ग
जिल्ह्यातील वातावरणात उसाच्या कोणत्या जाती अनुकूल आहेत, याचा अभ्यास होणे गरजेचे होते. संशोधन केंद्राने सुरू केलेले संशोधन हे भविष्यात जिल्ह्यातील ऊस उत्पादकांसाठी दिशादर्शक ठरेल.
विनोद जठार, शेतकरी, नापणे, जि. सिंधुदुर्ग.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com