Milk Union Elections : दोन मंत्री, आमदार, माजी आमदारांची काट्याची लढत

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत माजी मंत्री एकनाथ खडसे विरुद्ध महाविकास आघाडी पॅनल, तर विद्यमान मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात भाजप-शिंदे गट पॅनल अशी लढत होत आहे.
Milk Union Elections
Milk Union Elections Agrowon

जळगाव : जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत (Milk Union Elections) माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) विरुद्ध महाविकास आघाडी पॅनल, तर विद्यमान मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात भाजप-शिंदे गट पॅनल अशी लढत होत आहे. यात आता दोन मंत्री, आमदार व माजी आमदार यांची काट्याची लढत आहे. राष्ट्रवादीचे पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ बिनविरोध झाले आहेत. दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीत अर्ज माघार घेण्याचा सोमवारी (ता. २८) शेवटचा दिवस होता.

Milk Union Elections
राज्यात यंदा 137 lakh Tonnes Sugar Production झाले |Sugar Bajarbhav|ॲग्रोवन

‘राष्ट्रवादी’चे वाघ शिंदे-भाजप गटात बिनविरोध

राष्ट्रवादी काँग्रेसचे पाचोरा येथील माजी आमदार दिलीप वाघ हे एकमेव पाचोरा मतदार संघातून बिनविरोध झाले आहेत. ते अगोदर महाविकास आघाडी पॅनलमध्ये होते, मात्र बिनविरोध होताच त्यांनी शिंदे -भाजप गटात प्रवेश केल्याचे जाहीर केले. वाघ यांच्या विरोधात शिंदे-भाजप गटाचे आमदार किशोर पाटील यांनी माघार घेतली आहे.

१४-१ अशा लढती- असे उमेदवार

जळगाव तालुका- मंत्री गुलाबराव पाटील विरुद्ध मालतीबाई महाजन, मुक्ताईनगर -मंदाकिनी खडसे विरुद्ध आमदार मंगेश चव्हाण, जामनेर-मंत्री गिरीश महाजन विरुद्ध दिनेश पाटील, अमळनेर-आमदार अनिल भाईदास पाटील विरुद्ध माजी आमदार स्मिता वाघ, एरंडोल-भागचंद (अमर) जैन विरुद्ध दगडू धोंडू चौधरी, चाळीसगाव-प्रमोद पांडुरंग पाटील विरुद्ध सुभाष नानाभाऊ पाटील, चोपडा-इंदिराताई भानुदास पाटील विरुद्ध रोहित दिलीप निकम, धरणगाव-

संजय मुरलीधर पवार विरुद्ध वाल्मीक विक्रम पाटील, पारोळा-आमदार चिमणराव पाटील विरुद्ध माजी आमदार डॉ.सतीश पाटील, बोदवड तालुका-ॲड. रवींद्र पाटील विरुद्ध मधुकर रामचंद्र राणे, भडगाव-रावसाहेब भोसले विरुद्ध डॉ. संजीव कृष्णराव पाटील, यावल- हेमराज खुशाल चौधरी विरुद्ध नितीन नारायण चौधरी, रावेर- जगदीश लहू बढे विरुद्ध ठकसेन भास्कर पाटील, अनु-जाती-जमाती- संजय वामन सावकारे

विरुद्ध श्रावण सदा ब्रह्मे, इतर मागासवर्ग- गोपाळ रामकृष्ण भंगाळे विरुद्ध पराग वसंतराव मोरे, महिला राखीव (दोन संचालक)- पूनम प्रशांत पाटील, सुनीता राजेंद्र पाटील विरुद्ध उषाबाई विश्‍वासराव पाटील, मनीषा अनंतराव सूर्यवंशी, सुनीता राजेंद्र पाटील, छाया गुलाबराव देवकर, विजाभज विमाप्र- विजय रामदास पाटील विरुद्ध अरविंद भगवान देशमुख.

गिरीश महाजन, गुलाबराव मैदानात

जळगाव जिल्हा दूध संघ निवडणुकीच्या मैदानात राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील प्रथमच मैदानात उतरले आहेत. त्यांची सरळ थेट एकास एक लढत होत आहे.

जामनेर तालुक्यातून मंत्री महाजन यांच्या विरोधात नेरी येथील माजी सरपंच दिनेश पाटील लढत देत आहेत, तर जळगाव तालुक्यातून मंत्री पाटील यांच्या विरोधात जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांच्या सासूबाई तसेच शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या मातोश्री मालतीबाई महाजन लढत देत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com