Womens Self-Help Group : नागपुरात होणार महिला बचत गटाचे दोन मॉल

शहर तहसील कार्यालयासमोर असलेल्या सरपंच भवन येथील जिल्हा परिषदेच्या जागेवर महिला बचत गटासाठी मॉल मंजूर असून, दुसरा मॉल बडकस चौक येथे होणार आहे.
Womens Self-Help Group
Womens Self-Help GroupAgrowon

नागपूर : शहर तहसील कार्यालयासमोर असलेल्या सरपंच भवन येथील जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) जागेवर महिला बचत गटासाठी (Womens Self-Help Group) मॉल मंजूर असून, दुसरा मॉल बडकस चौक येथे होणार आहे. जिल्हा परिषदेकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष याचे सादरीकरण करण्यात आले असून त्यांनी प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रस्तावित मॉल ६ माळ्यांचा असणार आहे. यासाठी २५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिला बचत गटांकडून तयार करण्यात आलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. सरपंच भवन येथेही एक मॉल उभारण्यात येणार आहे.

यावर साडेतीन कोटींचा खर्च होईल. या मॉलला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. माहितीनुसार या मॉलच्या कामाला प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात येणार आहे. परंतु शासनाकडून कामांना दिलेल्या स्थगितीचा फटका या मॉलला बसला. आता शासनाने कामांवरील स्थगिती उठविल्याने या मॉलचा कामाच्या मार्ग मोकळा होणार असल्याचे सांगण्यात येते.

थकीत निधीची मागणी

जिल्हा परिषदेचा मुद्रांक शुल्काचा ५० वर कोटींचा निधी थकीत आहे. त्याचप्रमाणे पंचायत समिती इमारत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी निधीची आवश्यकता आहे. थकीत निधीसह आवश्यक कामाकरिता निधी देण्याची मागणीही जिल्हा परिषदेच्या वतीने उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com