Unseasonal Rain : ‘अवकाळी’च्या सावटामुळे हळद उत्पादक चिंतातूर

Weather News : गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीसारखी परिस्थिती तयार होत आहे.
Turmeric Harvesting
Turmeric HarvestingAgrowon
Published on
Updated on

Washim News : गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीसारखी परिस्थिती तयार होत आहे. जिल्ह्यात या वातावरणामुळे हळद उत्पादक शेतकरी कमालीचा चिंतातूर झालेला आहे.

Turmeric Harvesting
Akola Unseasonal Rain : अवकाळी पावसाचा तिसऱ्या दिवशीही धुमाकूळ

मालेगाव तालुक्यात शिरपूरसह परिसरात गेल्या काळात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला होता. त्यानंतरही या पावसाचे सावट सध्या निर्माण झाले आहे. अवकाळी पावसाने भाजीपाला, कांदा बीजोत्पादन, कलिंगड, तसेच शिरपूर भागामध्ये मुख्य पीक असलेल्या हळदीला फटका दिला.

Turmeric Harvesting
Unseasonal Rain Update : चिपळूणमध्ये वाऱ्यासह वादळी पाऊस, गारा

शिरपूर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर हळदीची लागवड केली जाते. जिल्ह्यामध्ये शिरपूर जैन येथे सर्वांत जास्त हळदीचे लागवड क्षेत्र आहे. सध्या हळद बॉयलरमध्ये शिजवून ती सुकवण्याचे काम जोराने सुरू आहे. अशातच अधूनमधून ढगाळ वातावरण तयार होणे, कधी अवकाळी पाऊस येण्याची चिन्हे तयार होत असल्याने ही हळद झाकण्यासाठी एकच कसरत करावी लागते.

हळद उत्पादकांना महागड्या ताडपत्र्या खरेदी कराव्या लागल्या आहेत. शिवाय हळदीवर प्रक्रिया करण्यासही अडचणी येत आहेत. वातावरण उघडताच हळद उन्हात वाळवण्यासाठी मोकळी केली जाते. तर सायंकाळी पुन्हा ताडपत्रीने झाकून ठेवावी लागत आहे. वाळवण्याची प्रक्रिया पूर्ण होत नसल्याचा परिणाम हळदीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com