
Raju Shetti VS Ravikant Tupkar : माजी खासदार राजू शेट्टी यांच्या संघटनेतून रविकांत तुपकर फारकत घेणार का यावर जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान रविकांत तुपकर यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांच्यावर संघटनेतील अंतर्गत वादाच्या मुद्दांवरून आरोप केले होते. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन समितीने रविकांत तुपकरांना आपले म्हणणे मांडण्यासाठीचा १५ ऑगस्टपर्यंत अल्टीमेटम दिला होता. तुपकर यांच्यावर कारवाई होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्यावर उघडपणे टीका केली यावर राजू शेट्टी म्हणाले होते की, तुपकरांनी आपली भूमिका माध्यमांसमोर न मांडता त्यांनी शिस्तपालन समितीसमोर त्यांचं म्हणणं मांडावं अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली होती.
याबाबत पुण्यात शिस्तपालन समितीच्या बैठकीचे आयोजनही केले होते. मात्र, रविकांत तुपकर त्या बैठकीला हजर राहिले नव्हते. या बैठकीत तुपकरांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतचा कालावधी देण्यात आला होता.
तुपकरांचे राजू शेट्टींना पत्र
यावर रविकांत तुपकर हे १५ ऑगस्टपर्यंत शिस्तपालन समितीसमोर हजर झालेच नाही. रविकांत तुपकरांनी आपले राजू शेट्टी यांच्या कार्यपद्धती आणि भूमिकांबद्दल असणारे आक्षेप लेखी पत्राद्वारे राजू शेट्टी आणि समितीला पाठवल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान रविकांत तुपकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा फोन बंद होता. १० पानांचे भले मोठे पत्र तुपकरांनी राजू शेट्टींना पाठवल्याचे समजते. त्यामुळ आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शिस्तपालन समिती पुढे काय भूमिका घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राहूनच काम करणार असल्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मांडली. मी या पक्षात जाणार, मी त्या पक्षात जाणार अशा अफवा सुरु आहेत. त्या अफवा थांबवाव्यात असेही तुपकर माध्यमांसमोर म्हणाले होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.