Market Rate Vegetables : टोमॅटो, वांगी दरात घसरण तर डाळी, गोडतेलाच्या दरात किंचीत वाढ

vegetables Rate : मागच्या आठवड्यापासून पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात उघडीप दिल्याने भाजीपाल्याची आवक चांगली होत आहे.
Market Rate Vegetables
Market Rate Vegetablesagrowon

Vegetables Market Rate : मागच्या आठवड्यापासून पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात उघडीप दिल्याने भाजीपाल्याची आवक चांगली होत आहे. दरम्यान सांगलीसह कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला कोल्हापुरात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून घाऊक बाजारात ८० रुपये, तर किरकोळ बाजारात शंभरी पार केलेल्या वांग्याचे दर थोडे कमी झाले आहेत.

दरम्यान वांगी आणि टोमॅटो सध्या १०० ते १२० रुपयांच्या आसपास आले आहेत. १०० ते १२० रुपये किलोपर्यंत दर पोहोचले होते. दरम्यान टोमॅटो सध्या ३० ते ८० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. गेल्या तीन-चार महिन्यांपासून गवार मात्र चांगलीच तेजीत आहे. सध्या गवारला १०० रुपये किलो भाव मिळत आहे.

गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याच्या दरात चढउतार कायम राहिला आहे. वांगी, टोमॅटो, ढबू, घेवडा दरांत घसरण झाली आहे. ओली मिरची, काकडी, ओल्या वाटाण्याच्या दरांत वाढ झाली आहे. कडधान्य मार्केट एकदम शांत असून गोडेतेलाचे दर स्थिर राहिले आहेत.

ओल्या वाटाण्याची आवक एकदम कमी असल्याने दर तेजीत आहेत. घाऊक बाजारात ७२ रुपये दर असून किरकोळमध्ये १०० रुपयांच्या पुढे दर आहे. कारली, भेंडी, वरणा, दोडका दर काही अंशी कमी झाले असले तर उत्तम प्रतिचा माल जुन्या दराने विक्री होत आहे. बिनीस ८० ते १०० रुपये तर फ्लॉवर २० रुपये गड्डा असा विकला जात आहे.

कडधान्य बाजारामध्ये तूरडाळ, हरभराडाळ, मसूरडाळ, मटकी, मूग यांचे दर स्थिर आहेत. साखर, गोडेतेलाच्या दरात मागच्या १ महिन्यापासून दरात कोणताही बदल झाला नाही. फळ मार्केटमध्ये सफरचंद, पेरू, डाळिंब, अननसची रेलचेल पाहावयास मिळत आहे.

कोथिंबीरची रविवारी तब्बल ४२ हजार ५०० पेंढ्यांची बाजार समितीत आवक झाल्याने दर एकदम खाली आले. २० रुपये असणारी पेंढी पा रुपयांपर्यंत आली आहे. कांदापात, मेथी, पालक, शेपू या पालेभाज्यांचे दर स्थिर राहिले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com