Eknath Shinde
Eknath ShindeAgrowon

चर्चेची वेळ निघून गेली: सरकार पडल्यावरच शिंदे परतणार

पुढच्या काही वेळात बैठक घेऊन यावर आमदारांशी बोलून निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले. राऊत यांच्या प्रस्तावावर एकनाथ शिंदे थोड्याच वेळात व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया देणार आहेत.

शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या 'मुंबईत परतून चर्चा करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देताना शिंदे गटाकडून चर्चेची वेळ निघून गेल्याचे स्पष्ट करण्यात आले. सरकार पडल्यावरच महाराष्ट्रात परतणार असल्याचा निर्धार शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून व्यक्त करण्यात आला.

तुम्ही आधी मुंबईत या मग तुमच्या आग्रहानुसार महाविकास आघाडीतून बाहेर पडून अन्य पर्यायांचा विचार करता येईल , असे सांगत संजय राऊत (Sanjay Ruat)यांनी शिंदे गटाला महाराष्ट्रात परतण्याचे आवाहन केले होते. त्यावर शिंदे गटाने राऊतांच्या आवाहनाला एकनाथ शिंदे यांच्याकडून तातडीने प्रत्युत्तर देण्यात आले.

Eknath Shinde
महाराष्ट्राचं सोडा, पूरग्रस्त नागरिकांना मदत करा: ममता बॅनर्जींच्या आसाम सरकारला कानपिचक्या

आता 'संजय राऊत यांच्या प्रस्तावावर विचार करण्याची वेळ निघून गेली आहे, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. चाळीसहून अधिक शिवसेनेचे आमदार आपल्यासोबत असल्याचा दावाही शिंदे यांनी केला. पुढच्या काही वेळात बैठक घेऊन यावर आमदारांशी बोलून निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले. राऊत यांच्या प्रस्तावावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde)थोड्याच वेळात व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया देणार आहेत.

दरम्यान एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने घातलेल्या अटीमुळे आता सरकार पडणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे सरकार पाडूनच शिंदे गट महाराष्ट्रात परतणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिकडे मुंबईत शिवसेनेकडूनही सर्वसामान्य शिवसैनिक कसे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहेत, हे दाखवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच शिंदे गटातील काही आमदारांना परत आणण्याचा प्रयत्नही सुरु आहे.

Eknath Shinde
महाविकास आघाडीतून बाहेर पडू पण मुंबईत या: राऊतांची शिंदेंना साद

शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार आपल्यासोबतच असून आपणच मूळ शिवसेना आहोत, हे सिद्ध करण्याची तयारी शिंदे यांनी केली आहे. शिवसेनेचे निवडणूकचिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरही हक्क सांगण्याची आणि त्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया करण्याची शिंदे गटाची तयारी आहे. त्यासाठी भाजपकडून त्यांना मदत केली जाणार असल्याची चर्चा आहे. थोड्या वेळापूर्वी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा (Himanta Biswa Sharma) हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीस गेल्याचे वृत्त आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com