Unseasonal Rain : मराठवाड्यात विविध भागांत विजांसह पावसाचा धुमाकूळ

मराठवाड्याच्या विविध भागांत शुक्रवारी (ता.७) दुपारनंतर विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाने अनेक भागात धुमाकूळ घातला.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Rain Update Marathwada छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या विविध भागांत शुक्रवारी (ता.७) दुपारनंतर विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाने (Unseasonal Rain) अनेक भागात धुमाकूळ घातला.

शनिवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला.तीन जण जखमी झाले. सहा जिल्ह्यांत अंगावर वीज पडून २५ जनावरांचाही मृत्यू झाला. वादळी पावसाच्या दणक्याने बळीराजाचे अतोनात नुकसान (Crop Damage) झाले.

मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत अवकाळीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

तर तीन व्यक्ती जखमी झाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १२ , जालना व नांदेड जिल्ह्यातील प्रत्येकी तीन बीड व लातूर जिल्ह्यांतील प्रत्येकी एक व धाराशिव जिल्ह्यातील चार जनावरांचा मृत्यू झाला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६५ पैकी ६१ मंडलांत पाऊस झाला. जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात सरासरी २२.७ मि.मी पाऊस झाला. पिशोर मंडलात सर्वाधिक ४६.५ मि.मी पाऊस झाला.

Crop Damage
Crop Damage Compensation : सरसकट मदतीला चाप?

बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, अंबाजोगाई तालुक्यांतील काही मंडलांत तुरळक पाऊस झाला. लातूर जिल्ह्यात सरासरी ८.८ मि.मी, धाराशिवमध्ये सरासरी ०.६ मि.मी तर जालना जिल्ह्यात सरासरी ४.९ मि.मी पाऊस झाला.

छत्रपती संभाजीनगरच्या सिरसाळा येथे वीज पडून अंबादास भिका राठोड यांचा मृत्यू झाला. याशिवाय ५ गाईंचा मृत्यू झाला. सोयगाव तालुक्यातील वरखेडी येथील ३ व्यक्ती वीज पडून जखमी झाले.

कन्नड तालुक्यातील लोहगाव येथील १ बैल व देवपूर येथील २ बैल मृत झाले. फुलंब्री तालुक्यात रांजणगाव येथे १ बैल मृत्यूमुखी पडला. पैठण तालुक्यातील मुलांनी वडगाव येथे १ गाय व १ बैल मृत झाले.

Crop Damage
Mango Crop Damage : उन्हाचा चटका हापूसला फटका

जालना तालुक्यात कडवंची येथे १ गाय वीज पडून मृत झाली. भोकरदन तालुक्यात वालसावंगी येथे १ बैल व आडगाव येथे १ गाय वीज पडून मृत झाली.

लातूर जिल्ह्यातील नेलवाड येथे १ म्हैस मृत्युमुखी पडली. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील कुन्हाली येथे २ म्हैस व हिप्परगाव येथे १ म्हैस, नाई चाकूर येथे १ म्हैस मृत्यूमुखी पडली.

आंबा, बाजरीसह विविध पिके भुईसपाट

वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाचा विविध भागांतील आंबा बागांना फटका बसला आहे. काढणीला आलेल्या रब्बीतील पिकांसह बाजरी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com