kalamb APMC : कळंब बाजार समितीच्या हिटलिस्टवर भुखंड घेणारे

कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी परवानाधारकांना भूखंड वाटप केले होते.
kalamb APMc
kalamb APMcAgrowon

कळंब, जि. उस्मानाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Kalamb APMC) आवारात खुला भूखंड (APMC Land) असणाऱ्या परंतु न्यायालयात कोणताही वाद नसणाऱ्या भूखंडधारकांनी (Land Holder) तत्काळ बांधकाम सुरू करावेत अन्यथा भूखंड रद्द करण्याची प्रक्रिया करण्यात येईल, असा सक्त इशारा बाजार समितीच्या प्रशासक बी. एस. फासे यांनी दिला आहे.

यामुळे अतिक्रमणधारकांसोबतच आता बाजार समितीने व्यवसायासाठी दिलेल्या भूखंडावर व्यापार न करता गुंतवणूक म्हणून घेणारेही बाजार समितीच्या हिटलीस्टवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी परवानाधारकांना भूखंड वाटप केले होते. भूखंड मागणी करणाऱ्या अर्जदारांना अटीशर्तीला अधीन राहून भूखंड मिळाल्यानंतर तत्काळ बांधकाम करून ज्या व्यवसायासाठी भूखंड दिला तो व्यवसाय करणे आवश्यक आहे.

अशी अट असतानाही काही भूखंडधारकांनी बांधकाम केले नसल्याने त्या भूखंडावर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे बाजार समितीच्या विकासावर परिणाम झाला आहे.

kalamb APMc
Mumbai APMC : मुंबई बाजार समिती सभापतिपदी शिंदे गटाचे प्रभू पाटील?

या करीता बाजार समितीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली असून लवकरच अतिक्रमणावर हातोडा चालणार आहे, असेही प्रशासक फासे यांनी म्हटले आहे. अतिक्रमण हटविल्यानंतर पुन्हा त्या जागेवर अतिक्रमण होऊ नये याची दक्षता म्हणून बांधकामे सुरू करावीत सांगण्यात आले.

kalamb APMc
APMC Income: उत्पन्न गळतीवर हवे नियंत्रण

बाजार समितीने घालू दिलेल्या नियम व अटी शर्ती उल्लंघन केले म्हणून भूखंड करण्याबाबत कायदेशीर कार्यवाह केली जाईल असा स्पष्ट इशार बाजार समिती प्रशासनाने दिला आहे.

याबाबत लवकरच समितीकडू संबंधितांना नोटीस देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. बाजार समितीच्या परिसरातील ३५ भूखंडावर संबंधित भूखंडधारकांनी अजूनही बांधकाम केले नसल्याचे समोर आले असून काहींनी गुंतवणूक म्हणून हे भूखंड घेतल्याची माहिती आहे.

त्यामुळे ज्यांना या परिसरात व्यापार करावयाचा आहे त्यांना भूखंड उपलब्ध होत नाही. काही भूमाफियांनी पलटी करण्यासाठी या भागात भूखंड घेतल्याची चर्चा आहे.

...तर व्यावसायात होईल वाढ

या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी बाजार समितीने उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. कोटींच्या घरात किंमत असलेल्या बाजार समितीचे हे भूखंड त्यामुळे गरजू व्यापाऱ्यांना तर मिळेलच तसेच व्यवसायातही वाढ होऊ शकणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com