Ganesh Sugar Mill Election : अहमदनगर जिल्ह्यातील राहता येथील श्री गणेश कारखाना निवडणुकीत काॅंग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि जिल्हा बॅंकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या गटाने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या ताब्यातून कारखाना घेतला. बाळासाहेब थोरात व विवेक कोल्हे यांच्या गणेश कारखाना परिवर्तन पॅनलला १९ पैकी १८ जागांवर विजय मिळवला.
गणेश कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून राहता तालुक्यातील राजकीय वातावरण चागंलच तापले होते. या निवडणुकीच्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व माजी मंत्री व काॅंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आमने-सामने आले होते. दोघांची प्रतिष्ठापणाला लागल्याने प्रचारात थोरात-विखे-पाटील यांच्यात चांगलेच आरोपप्रत्यारोप रंगले होते. ८ हजार २३४ मतदारांपैकी ७ हजार ३३५ मतदारांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्का बजावला.
सोमवारी सकाळी गणेश कारखाना निवडणुकीसाठी राहता येथे मतमोजणी सुरू आहे. पहिल्या फेरी अखेर थोरात-कोल्हे गटाने जवळपास सर्वच मतदारसंघातून आघाडी घेतली होती. निवडणुकीतील पहिला निकाल विखे-पाटील गटाच्या बाजूने लागला. ब वर्गातील उमेदवार ज्ञानदेव बाजीराव चोळके यांनी थोरात-कोल्हे गटाचे सुधाकर जाधव यांचा १५ मतांनी पराभव केला. तर शिर्डी गटात थोरात-कोल्हे गटाचे बाबासाहेब दादा डांगे व विजय भानुदास दंडवते हे दोघे पहिल्या फेरीत ६५० ते ७०० मतांनी विजयी झाले. शिर्डी पाठोपाठ राहाता गटात ही थोरात कोल्हे गटाने बाजी मारली. या गटात थोरात-कोल्हे गटाचे नारायणराव कार्ले व संपत कचरू हिंगे विजयी झाले.
गणेश सहकारी साखर कारखान्यावर अनेक वर्षे माजी मंत्री शंकर कोल्हे आणि शिवाजीराव कोते-पाटील यांचे वर्चस्व होतं. मात्र, गेल्या काही कालावधीपासून हा कारखाना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ताब्यात होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.