Summer Heat : यंदाचा फेब्रुवारी १२३ वर्षातील सर्वाधिक उष्ण

यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल लागली. सूर्य चांगलाच तळपल्याने यंदाचा फेब्रुवारी महिना १२३ वर्षातील सर्वाधिक उष्ण ठरला आहे.
Heat Wave
Heat WaveAgrowon
Published on
Updated on

Weather Update पुणे : यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल (Summer Season) लागली. सूर्य चांगलाच तळपल्याने यंदाचा फेब्रुवारी महिना १२३ वर्षातील सर्वाधिक उष्ण (Hot Summer) ठरला आहे. या फेब्रुवारीत देशात सरासरी २९.६६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

सरासरीपेक्षा अधिक, किमान तापमानातही यंदाचा फेब्रुवारी आतापर्यंतच्या पाचव्या स्थानावर असल्याचे हवामान विभागाने (Weather Department) स्पष्ट केले आहे.

यंदा फेब्रुवारीत देशामध्ये २९.६६ अंश सेल्सिअस सरासरी कमाल तापमान, तर १६.३७ अंश सेल्सिअस सरासरी किमान तापमान नोंदविले गेले आहे.

१९८१ ते २०१० या तीस वर्षांतील सरासरी तापमानाचा विचार करता फेब्रुवारी महिन्याचे कमाल सरासरी तापमान २७.८० अंश तर किमान सरासरी तापमान १५.४९ अंश सेल्सिअस आहे.

या तुलनेत यंदा कमाल तापमानात १.८६ अंश सेल्सिअस तर किमान तापमानात ०.८८ अंशांची वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे.

Heat Wave
Weather Update : तापमानात चढ-उतार; चटका कायम

१९०१ पासूनचे १२३ वर्षांमधील कमाल तापमान विचारात घेता, यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंतचे सर्वाधिक २९.६६ अंश सेल्सिअस सरासरी कमाल तापमान नोंदले गेले आहे.

यापूर्वी २०१६ च्या फेब्रुवारीत सरासरी २९.४८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर या १२२ वर्षांतील सरासरी पेक्षा अधिक किमान तापमानाचा विचार करता यंदाचा फेब्रुवारी पाचव्या क्रमांकावर आहे.

यापूर्वी २०१६ च्या फेब्रुवारीमध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक १६.८२ अंश सेल्सिअस, तर २००६ मध्ये चौथ्या क्रमांकाच्या सरासरीपेक्षा अधिक किमान १६.४२ अंश तापमानाची नोंद झाली होती.

महाराष्ट्रासाठी दुसरा उष्ण फेब्रुवारी

महाराष्ट्रासह मध्य भारतातील सरासरी कमाल तापमानाचा विचार करता यंदा फेब्रुवारीत आतापर्यंतच्या दुसऱ्या क्रमांकाच्या ३२.०४ अंश सेल्सिअस सरासरी कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

यापूर्वी २००६ मध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक उष्ण (सरासरी ३२.१३ अंश) फेब्रुवारीची नोंद झाली होती. फेब्रुवारीचे महाराष्ट्राचे सरासरी कमाल तापमान २९.८८ अंश सेल्सिअस आहे. यंदा त्यापेक्षा २.१६ अंश सेल्सिअस अधिक तापमानाची नोंद झाली आहे.

सरासरीपेक्षा अधिक किमान तापमान पाहता मध्य भारतात यंदा तिसऱ्या क्रमांकाच्या म्हणजेच २४.०८४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

Heat Wave
Summer Season : झळा उन्हाच्या, चिंता पावसाची

१२३ वर्षांतील सर्वांत उष्ण फेब्रुवारी (तापमान अंश सेल्सिअसमध्ये)

वर्ष---कमाल तापमान

२०२३---२९.६६

२०१६---२९.४८

२००६---२९.३१

२०१७---२९.२४

२००९---२९.२३

फेब्रुवारी २०२३ मधील देशाचे सरासरी तापमान

विभाग---कमाल---किमान

वायव्य भारत---२५.०४---१०.१६

पूर्व आणि ईशान्य भारत---२७.५२---१४.०४

मध्य भारत---३२.०४---१६.१३

दक्षिण भारत---३२.०४---२१.४९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com