Pune News: हवेली तालुक्यात नवी १५ मंडलाधिकारी सजा होणार

पुणे जिल्ह्यात राज्य शासनाच्या मान्यतेनुसार राज्यात नवी ३३१ तलाठी सजा (तलाठ्याचे कार्यक्षेत्र) व ५५ मंडल अधिकारी सजा तयार होणार आहेत.
Haveli Pune News
Haveli Pune NewsAgrowon

Pune News : पुणे जिल्ह्यात राज्य शासनाच्या मान्यतेनुसार राज्यात नवी ३३१ तलाठी सजा (तलाठ्याचे कार्यक्षेत्र) व ५५ मंडल अधिकारी सजा तयार होणार आहेत. त्यापैकी हवेली तालुक्यात नव्याने १५ मंडलाधिकारी (Mandal Adhikari) सजांची निर्मिती होणार आहे.

हवेलीत यापूर्वी आठ मंडलाधिकारी सजा असून, त्यात १५ सजांची नव्याने वाढ झाल्याने हवेलीत एकूण २३ मंडलाधिकारी कार्यालये होणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (Collector Office) सूत्रांनी दिली.

Haveli Pune News
Agriculture Subsidy :योजनांच्या अनुदानातील तफावतीने शेतकऱ्यांत संताप

जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे आस्थापनेवरील नव्याने निर्माण झालेल्या ५५ मंडलाधिकारी पदे, तहसीलदार तथा आहरण व संवितरण अधिकारी यांना कार्यन्वित करण्याबाबत जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी सूचना दिलेल्या आहेत.

सद्यःस्थितीत हवेली तालुक्यात हडपसर, थेऊर, उरुळी कांचन, वाघोली, कळस, खडकवासला, खेड शिवापूर, कोथरूड अशी आठ मंडलाधिकारी कार्यालये आहेत.

त्यामध्ये नव्याने उरुळी देवाची, महमंदवाडी, फुरसुंगी, कात्रज, कोंढवा, आंबेगाव बुद्रुक, धायरी, डोणजे, खानापूर, शिवणे, कोंडवे धावडे, अष्टापूर, लोणी काळभोर, खराडी, लोणीकंद अशी १५ मंडलाधिकारी कार्यालये होणार आहेत.

Haveli Pune News
Agricultural Research : वागनिंगेन विद्यापीठ : शेती संशोधनाची पंढरी

लोणी काळभोर मंडलाधिकारी कार्यालयात नव्याने लोणी काळभोर, सिद्राम मळा, आळंदी म्हातोबा, कदमवाकवस्ती, तरडे या नवीन तलाठी सजांचा समावेश असणार आहे.

त्याचप्रमाणे थेऊर मंडल अधिकारी कार्यालयांतर्गत थेऊर, कुंजीरवाडी, कोलवडी, मांजरी बुद्रुक, महादेवनगर व मोरे वस्ती या तलाठी सजांचा समावेश राहणार आहे. दरम्यान, मंडल सजा वाढणार असल्याने नागरिकांची कामे मार्गी लागणार आहेत.

प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य असून हवेली तालुक्यात नव्याने १५ मंडल अधिकारी कार्यालये होणार असल्याने खातेदार शेतकरी बांधवाच्या फेरफारवरील तक्रारीच्या केसेसचे कामकाज विनाविलंब होईल अशी अपेक्षा आहे. तसेच फेरफार नोंदी वेळेवर निकाली काढण्याची आशा आहे.

- युगंधर काळभोर, माजी उपसभापती, हवेली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com