Indian Agriculture : शेतीमालाला भाव नसल्याने गावकऱ्यांनी अख्खे गावच विकायला काढले

देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा गाव शासनाला विकण्याचा ठराव
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
देवळा, जि. नाशिक ः रात्रीचा दिवस करून काबाडकष्ट करायचे त्यातच उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे सध्या कोणत्याही शेतीमालाला भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ माळवाडी

(ता. देवळा) येथील ग्रामस्थांनी सोमवारी (ता. ६) गावातील सभामंडपात एकत्र जमून संपूर्ण गावच शासनाला विकण्याचा ठराव केला. यामुळे कांद्यासह इतर शेतीमालाच्या बाजारभावाचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

माळवाडी गावातील शेतकरी सुमारे ५३४ हेक्टरवर शेती व्यवसाय करतात. त्यात भाजीपाला, ऊस, कडधान्य आणि नगदी प्रमुख पीक कांद्याचे घेतले जाते.

गेल्या तीन-चार वर्षांपासून कोणत्याही शेतीमालाला अपेक्षित दाम मिळत नसल्याने शेतकऱ्यांत प्रचंड असंतोष आहे.

दैनंदिन गरजा व खासगी, सरकारी बँकांची कर्जे चुकती करण्यासाठी कुठलाही पर्याय उरलेला नसल्याने माळवाडीतील ग्रामस्थ ज्यामध्ये महिलाही एकत्रित येत संपूर्ण गाव विकण्याचा ठराव केला.

Indian Agriculture
Agriculture Department : कृषी ‘उद्योग’ करण्यासाठी ‘डीबीटी’चे कवच काढले

शासन शेतकरीहितापेक्षा ग्राहकहिताला प्राधान्य देत आहे. यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे; पण आत्महत्या करण्यापेक्षा गाव विकून मिळणाऱ्या पैशांत तरी जगता येईल, या उद्वेगातून हा ठराव करण्यात आला.

शासनाने शेतकऱ्यांच्या गरजा भागवणे व कर्जमुक्त करण्याइतका तरी शेती उत्पादित मालाला भाव मिळवून द्यावा, अन्यथा आम्हाला गाव विकायचे आहे आणि ते सरकारने विकत घ्यावे, अशी मागणी शेतकरी प्रवीण बागूल, अमोल बागूल, राकेश सोनवणे, अविनाश बागूल, अक्षय शेवाळे आदी शेतकऱ्यांनी केली.

त्यास गावातील इतर शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शविला. या वेळी सर्वानुमते ठराव पास करण्यात आला. त्यावर संदीप बच्छाव, शिवाजी बागूल, प्रशांत बच्छाव, वैभव बच्छाव, महेश बागूल, महेंद्र बागूल, उदय बागूल, रोहन बागूल आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.कुठल्याही शेतीमालाला भाव नाही म्हणून आत्महत्या करण्यापेक्षा जमिनी विकून जगता यावे, म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ एकमताने गाव विकण्याचा ठराव करीत आहोत. केंद्र व राज्य शासनाने आमच्या जमिनी घेऊन आम्हाला पैसा उपलब्ध करून द्यावा.
- प्रवीण बागूल, युवा शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com