Sugarcane FRP : हमीभावाअभावी गोडवा हरवला

तळोदा तालुक्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांची भाववाढीची अपेक्षा
Sugar Cane FRP
Sugar Cane FRPAgrowon
Published on
Updated on

तळोदा : तळोदा शहरासह तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी (farmer) या वर्षीदेखील मोठ्या प्रमाणावर उसाची (Sugarcane Cultivation) लागवड केली आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षांपासून खांडसरी, तसेच कारखाने यांच्याकडून उसाला योग्य हमीभाव मिळत नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून वेळोवेळी व्यक्त होत असून, या वर्षी तरी उसाला (Sugarcane Rate) योग्य हमीभाव जाहीर करावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

तळोदा शहरासह तालुक्यातील असंख्य शेतकरी बांधवांनी उसाची लागवड शेतात केली आहे. पपई, केळी पिकांना पर्याय म्हणून तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांकडून उसाला प्राधान्य देण्यात आले आहे. ऊस बारमाही पीक असून, त्याला मोठ्या प्रमाणात खत, महागडे बियाणे, लागवडीचा खर्च, निंदणी, ठिबक सिंचन आदी खर्च येत असतो.

त्यातच सर्वच क्षेत्रांमध्ये महागाई वाढलेली असून, याचा फटका शेतकऱ्यांनासुद्धा सहन करावा लागत आहे. रासायनिक खतांचे दर वाढले आहेत. एक हजार ५० रुपयांना मिळणारी बॅग आता एक हजार ६०० रुपये ते एक हजार ७०० रुपयांवर जाऊन पोचली आहे. डिझेल, पेट्रोलचे दर वाढल्याने मशागतीचा खर्च दीडपटीने वाढला आहे. रासायनिक औषधांची तीच तऱ्हा आहे. असे असताना उसाला मिळणारा दर मात्र गेली कित्येक वर्षे एकाच जागेवरच अडकून पडला आहे.

लहरी हवामान, अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असून, त्यातच शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालास योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी पूर्णपणे भरडला जात आहे. लवकरच उसाचा गळीत हंगाम सुरू होणार आहे. मा चालू वर्षाच्या गळीत हंगामात उसाला तीन ते साडेतीन हजार रुपये प्रतिटन हमीभाव मिळावा, अशी अपेक्षा ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Sugar Cane FRP
Crop damage : शिरोळ तालुक्यात पंचनामे पूर्ण

मोठी लागवड

निसर्गाचा लहरीपणा, वाढती महागाई, योग्य हमीभावाचा अभाव अशा अनेक कारणांनी दिवसेंदिवस शेती अडचणीत येत आहे. मात्र विपरीत परिस्थिती असतानादेखील शेतकऱ्यांच्या दृष्टीने कमी जोखमीचे, हुकमी बागायती पीक समजल्या जाणाऱ्या उसाची लागवड तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर केली आहे.

एकंदरीत सर्व परिस्थिती लक्षात घेता या वर्षी तरी उसाला योग्य हमीभाव जाहीर करावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तळोदा तालुक्यात जवळपास सात हजार हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे.

Sugar Cane FRP
Farmer Producer Company : अर्जुना रिव्हरसाइड फार्मर प्रोड्यूसर कंपनीची स्थापना

इतर पिकांच्या तुलनेत ऊस हे कमी जोखमीचे व हमखास उत्पन्न देणारे पीक समजले जाते. मात्र काही वर्षांपासून उसाला कमी हमीभाव मिळत आहे, त्या तुलनेत उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे या वर्षी तरी उसाला चांगला हमीभाव मिळावा.

-अरुण चव्हाण, शेतकरी, चिनोदा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com