Shinde Gat : शिंदे गटाची सारवासारव

Shivsena (Shinde Gat) : फडणवीसांना डिवचल्यानंतर दोन्ही पक्षांत धुसफूस; भाजप नेत्यांचे शिंदे गटावर तोंडसुख
Eknath Shinde
Eknath ShindeAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : ‘केंद्रात मोदी, राज्यात शिंदे’ अशी जाहिरात करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचल्यानंतर शिंदे गटाने फडणवीस यांच्या छायाचित्रासह पुन्हा जाहिरात देत सारवासारव केली.

मंगळवारी (ता. १३) दिलेली जाहिरात कोणी दिली हे आम्हाला माहीत नाही, असेही घुमजाव शिंदे गटाने केले.

दरम्यान या जाहिरातींचे पडसाद दुसऱ्या दिवशीही उमटले. भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. ‘कितीही प्रयत्न केला तरी बेडकाचा हत्ती होत नाही. आज सर्वच क्षेत्रात फडणवीस यांचा बोलबाला आहे.

असे असताना आम्हाला डिवचू नका.’ असे सांगत शिंदे गटाला आव्हान दिले. शिंदे गटाचे नेते आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तरीही भाजप आणि शिंदे गटात अंतर्गत धुसफूस जोरात वाढली आहे.

Eknath Shinde
Chief Minister Eknath Shinde : छापेमारी प्रकरणात मुख्यमंत्री शिंदे संतापले अन् सत्तारांनी जोडले हात

शिंदे गटाच्या सर्वच मंत्र्यांची छायाचित्रे असलेली जाहिरात प्रसिद्ध केली आहे. वास्तविक भाजपच्या गोटातून नऊपैकी पाच मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत त्यांना डच्चू द्यावा, असे सांगितल्याची चर्चा सुरू होती.

मात्र, या मंत्र्यांचीही छायाचित्रे छापून आम्ही एकत्र आहोत. कुठल्याही मंत्र्याला डच्चू देणार नाही, असा संदेशही या जाहिरातीतून दिल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Eknath Shinde
CM Eknath Shinde : नवी मुंबई विमानतळासाठी सर्व सहकार्य ः मुख्यमंत्री शिंदे

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी, ‘शिंदे उत्कृष्ट आहेत, पण फडणवीसांशी तुलना नको’ असा सल्ला देत वादावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

बुधवारी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत, देशाला विकासाची दिशा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला ८४ टक्के नागरिकांची पसंती, डबल इंजिन सरकारमुळे राज्याच्या विकासाला गती येत असल्याचे ६२ टक्के नागरिकांचे मत तसेच ४६.४ टक्के नागरिकांची भाजप- शिवसेनेला पसंती असल्याचा दावा करण्यात आला आहे.

सामान्य नागरिक समाधानी
पंतप्रधान मोदी यांच्या पाठिंब्याने वर्षभरापासून विकास आणि प्रगतीच्या वाटेवर राज्याची गाडी वेगाने धावतेय. राज्यात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि शिवसेना-भाजपच्या भक्कम युतीमुळे पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, उद्योग क्षेत्रात राज्य आघाडीवर आहे.

शेतकऱ्यांचा सन्मान देणारे, आधार देणारे सरकार म्हणून ओळख तयार झाली आहे. सरकारच्या कामगिरीवर सामान्य नागरिक समाधानी आहेत. जनतेच्या स्वप्नातील राज्य आकाराला येत असल्याचा दावाही जाहिरातीतून केला आहे.

नऊ मंत्र्यांचे फोटो
आगामी मंत्रिमंडळ विस्तारात संजय राठोड, संदीपान भुमरे, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील यांची गच्छंती होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. तसा निरोप मुख्यमंत्री शिंदे यांना दिला असल्याचे सांगण्यात आले.

मात्र, शिंदे यांच्यासोबत आलेल्या बिनीच्या शिलेदारांना वगळणे फारसे सोपे नाही, तसेच शिंदे गट अभेद्य आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न या जाहिरातीतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

या मंत्र्यांसह दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर आणि शंभूराज देसाई यांच्या छायाचित्रांनाही जाहिरातीत स्थान दिले आहे. तसेच आजच्या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्रही प्रसिद्ध केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com