Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीचा उमेदवार गुलदस्त्यात

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकपूर्व चाचपणीसाठी नाना पटोले अमरावतीत आले होते. पाचही जिल्ह्यातील काँग्रेसच्या आमदार व पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात बैठक घेत त्यांनी त्यांची मते जाणून घेतली.
Mahavikas Aghadi
Mahavikas AghadiAgrowon

अमरावती : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातून (Amravati Padavidhar Election) सात जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. त्यापैकी एका नावाची घोषणा गुरुवारी (ता. १२) केली जाणार असून लगेच अर्जही दाखल केला जाईल. त्यावेळी मी स्वतः उमेदवारासोबत असेन, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले; मात्र उमेदवार कोण, हे त्यांनी अखेरपर्यंत गुलदस्त्यात ठेवले.

Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi Morcha : कोश्यारींना हटवा, अन्यथा महाराष्ट्र पेटून उठेल

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकपूर्व चाचपणीसाठी नाना पटोले अमरावतीत आले होते. पाचही जिल्ह्यातील काँग्रेसच्या आमदार व पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात बैठक घेत त्यांनी त्यांची मते जाणून घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांसोबत बोलताना त्यांनी उमेदवार कोण असेल, हे मात्र स्पष्ट केले नाही.

पटोले म्हणाले, की अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचाच उमेदवार राहणार आहे. पक्षाकडे माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी महापौर मिलिंद चिमोटे, डॉ. सुधीर ढोणे, डॉ. लोढा, भय्यासाहेब मेटकर, श्याम प्रजापती यांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे. उमेदवाराचे नाव १२ जानेवारीस अर्ज दाखल करण्यापूर्वी जाहीर केल्या जाणार आहे.

Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi : वाशीम जिल्ह्यात महाविकास आघाडीचा गुलाल

महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनेही दावा केला आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, गतवेळी शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी त्यांना देण्यात आली होती. पदवीधर हा मदतदारसंघ काँग्रेसकडे आहे.

त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार हा महाविकास आघाडीचा उमेदवार असेल. निवडणुकीसाठी काँग्रेसने तयारी पूर्ण केली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून काहीच प्रस्ताव नसून आमचाही त्यांच्याकडे प्रस्ताव नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

भाजपवर टीका करताना ते म्हणाले, दीड लाख मतदारांची नोंदणी करण्याचा त्यांचा दावा खोटा असून निवडणूक आयोगाकडे बोगस नोंदणी केल्याची तक्रार दाखल झाली आहे. या मुद्द्यावर आता न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. आम्ही पोलिंग एजंटला मतदारांच्या स्वाक्षरी तपासण्यास सांगितले आहे.

काँग्रेस ही निवडणूक जिंकणारच, असा भक्कम दावा करताना त्यांनी नुटा व विज्युक्टासोबत चर्चा करणार असून कर्मचारी संघटना तसेच डायगव्हाणे यांच्यासोबतही चर्चा करणार असल्याची माहिती यावेळी दिली.

बैठकीला माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख, प्रदेश प्रवक्ते व माजी महापौर मिलिंद चिमोटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, आमदार वजाहत मिर्झा, माजी आमदार वीरेंद्र जगताप, प्रदेश प्रवक्ते अ‍ॅड. दिलीप एडतकर प्रामुख्याने उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com