Agriculture Department : ‘कृषी’तील उपसंचालकांना अखेर मिळाली पदोन्नती

कृषी खात्यातील उपसंचालकांना ‘एसएओ’ पदावर पदोन्नती देण्यारे आदेश अखेर राज्य शासनाने गुरुवारी (ता.६) जारी केले. त्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी आंदोलनदेखील केले होते.
Department Of Agriculture
Department Of AgricultureAgrowon

Pune News : कृषी खात्यातील (Agriculture Department) उपसंचालकांना ‘एसएओ’ पदावर पदोन्नती (Promotion) देण्यारे आदेश अखेर राज्य शासनाने गुरुवारी (ता.६) जारी केले. त्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी आंदोलनदेखील केले होते.

या पदोन्नतीच्या प्रक्रियेत कृषी आयुक्तालयातील मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारीपदावर आता प्रवीण देशमुख यांची तर मुख्य सांख्यिकपदी धनवंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पदोन्नतीच्या यादीत मंत्रालयात घोळ केल्यामुळे ही प्रक्रिया रखडली होती. ८१ उपसंचालकांना पदोन्नती मिळणार होती. तथापि, ९ उपसंचालकांना निवृत्तीच्या दिवशी पदोन्नती दिली गेली आहे.

Department Of Agriculture
Agriculture Department : मराठवाड्यात कृषीच्या गतिमानतेला ग्रहण

काहींना सोयीच्या नियुक्त्या

कृषी आयुक्तालयातील मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारीपद ‘मलईदार’ समजले जाते. त्यामुळे या पदासाठी जोरदार व्यूहरचना चालू होती. तथापि, शासनाने देशमुख यांची नियुक्ती केली आहे. हे पद त्यांना त्यांच्या मागणीनुसार दिले गेले की त्यांना लॉटरी लागली, याबाबत अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होती. पदोन्नती देताना काही अधिकाऱ्यांना सोयीच्या नियुक्त्या मिळाल्या आहेत. त्यामुळे काही अधिकारी नाराज आहेत.

पदोन्नतीप्राप्त अधिकाऱ्यांची नावे, नियुक्तीचे ठिकाण असेः

दत्तात्रेय सोमनाथ दिवेकर (एसएओ, कोल्हापूर), डॉ.राहुल सातपुते (एसएओ, अमरावती), सुधाकर बोराळे (प्रकल्प व्यवस्थापक, फलोत्पादन मंडळ, पुणे), विवेक कुंभार (एसएओ, सांगली), डॉ.मुरलीधर इंगळे (प्रकल्प संचालक, आत्मा, अकोला), संजय काचोळे (एसएओ, पुणे), संतोष डाबरे (प्रकल्प संचालक,

आत्मा, यवतमाळ), वैभव तांबे (अन्न प्रक्रिया व्यवस्थापन तज्ज्ञ, स्मार्ट,पुणे), भाग्यश्री पवार (एसएओ, सातारा), पल्लवी देवरे (प्रकल्प व्यवस्थापक, फलोत्पादन मंडळ, पुणे),

संगीता माने (एसएओ, भंडारा), ऊर्मिला राजपूत (प्राचार्य, रामेती, खोपोली), रवींद्र मनोहरे (एसएओ, नागपूर), माणिक त्र्यंबके (कृषी निर्यात व काढणी पश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापन तज्ज्ञ, स्मार्ट, पुणे),

Department Of Agriculture
Agriculture Department News: ठाण्यातील भूखंडावर ‘कृषी’चे पाणी

विजय कोळेकर (मृद विज्ञान विशेषज्ञ, पोकरा, मुंबई), प्रभाकर शिवणकर (एसएओ, वर्धा), अनिल देशमुख (प्राचार्य, रामेती, पुणे), दीपक कुटे (एसएओ, ठाणे), विकास बंडगर (प्रकल्प संचालक, आत्मा, सातारा),

रवींद्र पाठक (प्रकल्प संचालक, आत्मा, सोलापूर), सुरेश भालेराव (एसएओ, सहसंचालक कार्यालय, पुणे), प्रकाश सूर्यवंशी (प्रकल्प संचालक, आत्मा, सातारा), दिलीप नेरकर (प्रकल्प संचालक, आत्मा, रायगड), राकेश वाणी (एसएओ, नंदुरबार),

विजय हिरेमठ (प्रकल्प संचालक, आत्मा, पुणे), बलसागर तौर (प्रकल्प संचालक, आत्मा, छत्रपती संभाजीनगर), धनवंत पाटील (मुख्य सांख्यिक, पुणे), जांबुवंत घोडके (प्रकल्प संचालक, आत्मा, सांगली),

विलास नलगे (प्रकल्प संचालक, आत्मा, अहमदनगर), शिवसांब लाडके (प्रकल्प संचालक, आत्मा, लातूर), प्रकाश देशमुख (एसएओ, छत्रपती संभाजीनगर), शांताराम मालपुरे (एसएओ,मग्रारोहयो, नाशिक), सर्जेराव तळेकर (मनुष्यबळ विकास व क्षमता बांधणी तज्ज्ञ, स्मार्ट),

रमेश जाधव (एसएओ, सहसंचालक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर), भिमाशंकर पाटील (समन्वयक अधिकारी, विभागीय प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट, ठाणे), पुरुषोत्तम उन्हाळे (प्रकल्प संचालक, आत्मा, बुलडाणा),

अशोक बाणखेले (निविष्ठा व गुणनियंत्रण, तंत्रज्ञान तज्ज्ञ, पुणे), पंढरी डाखळे (प्रकल्प संचालक, आत्मा, गडचिरोली), हरी बापतीवाले (धोरण विश्लेषक, स्मार्ट),

Department Of Agriculture
Agriculture Department : ज्येष्ठता यादीतील वरिष्ठांना डावलून कनिष्ठांना पदोन्नती

विनायक पवार (प्रकल्प संचालक, आत्मा, पालघर), जालिंदर पांगरे (प्रकल्प संचालक, आत्मा, रत्नागिरी), बालाजी ताटे (एसएओ, सहसंचालक कार्यालय, ठाणे), विजयकुमार राऊत (एसएओ, सिंधुदुर्ग),

संतोष नादरे (प्राचार्य, रामेती, छत्रपती संभाजीनगर), रवींद्र माने (कृषी अभियंता, स्मार्ट, मुंबई), महेश झेंडे (एसएओ, सहसंचालक कार्यालय, अमरावती), दौलत चव्हाण (प्रकल्प संचालक, आत्मा, परभणी), अनिल गवळी (प्रकल्प संचालक, आत्मा, नांदेड),

गहिनीनाथ कापसे (एसएओ,जालना), महेशकुमार तिर्थकर (एसएओ, सहसंचालक कार्यालय, लातूर), भास्कर कोळेकर (समन्वयक अधिकारी, विभागीय प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट, लातूर), प्रशांत नाईक (समन्वयक अधिकारी, विभागीय प्रकल्प

अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट, अमरावती), भाग्यश्री नाईकनवरे (प्रकल्प संचालक, आत्मा, सिंधुदुर्ग), नीलेश भागेश्वर (एसएओ, पालघर), वैशाली कुलकर्णी (एसएओ, मग्रारोहयो,छत्रपती संभाजीनगर),

ऊर्मिला चिखले (प्रकल्प संचालक, आत्मा, भंडारा), अर्चना निस्ताने (प्रकल्प संचालक, आत्मा, अमरावती), अजित आडसुळे (प्रकल्प संचालक, आत्मा, गोंदिया),

सुभाष साळवे (प्रकल्प संचालक, आत्मा, बीड), प्रीती हिरळकर, (प्रकल्प संचालक, आत्मा, चंद्रपूर), मनोजकुमार ढगे (एसएओ, बुलडाणा), पुनम खटावकर (एसएओ, मग्रारोहयो, नागपूर),

अनिसा महाबळे,(प्रकल्प संचालक, आत्मा, वाशीम), शंकर किरवे (एसएओ, अकोला), कुरबान तडवी (एसएओ, धुळे), प्रवीण देशमुख (मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, पुणे), अरुण कांबळे (कृषी तंत्रज्ञान क्षमता बांधणी तज्ज्ञ, स्मार्ट, पुणे).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com