Crop Pattern : पर्यायी पिकांतूनच बदलेल पीक पद्धती

Alternative Crop : पंजाब, हरियानातील शेतकऱ्यांना केवळ पीकपद्धतीत बदल करा, म्हणून सांगून चालणार नाही तर त्यांना भात, गव्हाऐवढेच त्याहूनही अधिक किफायतशीर ठरतील, अशी पर्यायी पिके द्यावी लागतील.
Crop Pattern
Crop PatternAgrowon
Published on
Updated on

Alternative Crops Pattern : पंजाबची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे शेतीवर अवलंबून असून, या राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या ८५ टक्के क्षेत्रावर शेती केली जाते. वालुकामय हलकी ते गाळ-चिकणमातीयुक्त भारी अशी विविधता पंजाबच्या शेतजमिनीत आढळते. सिंचनातही हे राज्य देशात आघाडीवर असून पंजाबधील ९८ टक्के जमीन ओलिताखाली आहे. असे असताना केवळ भात आणि गहू या दोन पिकांच्या जाळ्यातच पंजाबची शेती अडकलेली आहे. पूर्वी मका - गहू तसेच ऊस - मका - गहू अशी या राज्याची पीक पद्धती होती. परंतु मागील काही दशकांत भात, गहू ही दोनच पिके या राज्यात प्रामुख्याने घेतली जातात.

Crop Pattern
Sugarcane Farming : पर्यायी पीक म्हणून उसाचा पर्याय योग्य

रब्बीत थोडेफार क्षेत्र मोहरी या पिकाखाली देखील असते. अधिक गंभीर बाब म्हणजे गहू आणि भात या दोन पिकांसाठी रासायनिक खते, कीडनाशके आणि पाणी यांच्या होणाऱ्या अनियंत्रित वापराने जमीन, भूगर्भ तसेच भूपृष्ठावरील जलसाठे ही नैसर्गिक संसाधने प्रदूषित झाली आहेत. कीडनाशकांचे अंश अन्नपाण्यातून मानवी शरीरात जाऊन अवयव निकामी होण्यापासून ते कर्करोग अशा गंभीर आजाराने लोकांना ग्रासले आहे. जी गत पंजाबची तीच गत हरियानाची! या दोन्ही राज्यांतील शेतकऱ्यांना भात आणि गव्हाच्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी शासनस्तरावरून मागील चार दशकांपासून प्रयत्न सुरू आहेत. परंतु त्याला यश येताना दिसत नाही. भात आणि गव्हाला कर्जपुरवठा, मोफत वीज, अनुदान, शाश्वत उत्पादन, शासकीय खरेदीची हमी आणि हमीभावाचा आधार अशा कारणांमुळे पंजाबमधील शेतकरी या पिकांना सोडायला तयार नाही.

Crop Pattern
Crop Pattern : शेतकरी पर्यायी पिकांच्या शोधात

पंजाब, हरियानातील शेतकऱ्यांना केवळ पीक पद्धतीत बदल करा, म्हणून सांगून चालणार नाही तर त्यांना भात, गव्हाएवढेच किंबहुना त्याहूनही अधिक किफायतशीर ठरतील, अशी पर्यायी पिके द्यावी लागतील. खरे तर पंजाबच्या माती अन् वातावरणात मका, मूग, उडीद, गवार, हरभरा तसेच तेलबियांमध्ये मोहरीबरोबर सूर्यफूल, भुईमूग, जवस, काराळ ही पिके चांगली येऊ शकतात. या पिकांना पाणी, खते, कीडनाशके कमी लागतात. यांचा उत्पादन खर्च सुद्धा कमीच आहे. भाजीपाल्यामध्ये कांदा, बटाटा, टोमॅटो, वांगे, कोबी, भेंडी, गाजर, कारले, दोडका उत्तमरीत्या घेतली जाऊ शकतात.

फळपिकांमध्ये किन्नोबरोबर संत्रा, लिंबू, लिची, आंबा, केळी, आवळा, पिअर, पीच पंजाबच्या मातीत चांगली रुजू शकतात. ही सर्व पिके सध्याच्या पारंपरिक पीक पद्धतीत बसवून त्यांची लागवड वाढविण्याबाबत शेतकऱ्यांचे व्यापक प्रबोधन करावे लागेल. या पर्यायी पिकांचा पीक पद्धतीत समावेश होण्यासाठी सुरुवातीच्या काळात त्यांचे दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना मोफत वाटावे लागेल. तसेच या पिकांना पीककर्ज सुविधेसह प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना द्यावे लागेल. या पिकांचे प्रगत लागवड तंत्र देऊन उत्पादनवाढ साधावी लागेल. एवढेच नव्हे तर भात, गव्हासह यातील इतरही अनेक पिकांना हमीभावाचा आधार आहे, हे शेतकऱ्यांच्या मनावर बिंबवावे लागेल. हमीभावाच्या कक्षेतील शेतीमालाचे हमीभाव वाढवावे लागतील. पंजाबमध्ये भात, गहू उत्पादित झाल्याबरोबर त्याची हमीभावात शासकीय खरेदी होती. त्यामुळे त्यांच्या साठवणुकीची गरज शेतकऱ्यांना वाटत नाही. अशावेळी हंगामी पिकांसह फळे-भाजीपाल्यांची शीतसाठवण, वाहतूक, विक्री, प्रक्रिया, निर्यात अशी संपूर्ण मूल्यसाखळी देखील विकसित करावी लागेल.

पंजाबचा शेतीमाल देशांतर्गत तसेच विदेशात जाऊ लागला तर त्यांना अधिक दर मिळेल आणि ही पिके शेतकऱ्यांना किफायतशीर ठरू लागतील. असे झाले तरच भात, गव्हाला पर्यायी पिकांची लागवड पंजाबचे शेतकरी करतील. महाराष्ट्रात वैविध्यपूर्ण पिके घेतली जातात, त्यामागील कारणे बघितली तर येथील हवामान माती तर विविध पिकांना पोषक आहेच. परंतु काही पिकांच्या मूल्यसाखळीचा विकास होऊन असा शेतीमाल देशांतर्गत तसेच जगाच्या बाजारपेठेत पोहोचला आहे. त्यातून राज्यातील शेतकऱ्यांना चांगले अर्थार्जन पण होते, हे लक्षात घेतले पाहिजेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com