Soybean Rate : उत्पन्नाच्या तुलनेत सोयाबीनच्या काढणीवरच मोठा खर्च

परिसरात सोयाबीन काढणीचा हंगाम आता हाताखाली आला आहे. परंतु उत्पादकता, उत्पन्नाच्या तुलनेत काढणीवरच जास्त खर्च होत असल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे.
soybean rate
soybean rate agrowon

काकडा, अमरावती : परिसरात सोयाबीन (soybeance) काढणीचा हंगाम आता हाताखाली आला आहे. परंतु उत्पादकता, उत्पन्नाच्या तुलनेत काढणीवरच जास्त खर्च होत असल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. तथापि, बळीराजाने आता रब्बीसाठी शेतीची मशागत करायला सुरुवात केली आहे.

soybean rate
Soybean Rate : सोयाबीनचा भाव कितीवर पोचला?

कापसासोबतच परिसरात सोयाबीनची लागवड होते. लागवडीनंतर पावसाने दमदार हजेरी दिल्याने शेतकरी चिंतेत होते. त्यानंतरही गेल्या महिन्यापर्यंत परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. दमदार पाऊस सोयाबीनला पोषक ठरल्याने सोयाबीनची चांगली वाढ झाली.

त्यामुळेच या हंगामात सोयाबीन पीक चांगले पैसे देऊन जाईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती. परंतु, एकूण उत्पादकता खर्च आणि उत्पादन यामुळे खर्च जुळताजुळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला. परिणामी, पिकावर केलेल्या खर्चाची भरपाईदेखील होत नसल्याचे चित्र आहे. खरिपात सोयाबीनच्या विविध वाणांची पेरणी शेतकऱ्यांनी केली. यातील काही वाण कमी जास्त फरकाने काढणीला लवकरच येणार आहे. मात्र, काढणीला लवकर येणाऱ्या वाणांची स्थिती अत्यंत बिकट आहे.

soybean rate
Soybean Market : सोयाबीनच्या दरातील वाढ कायम | Agrowon | ॲग्रोवन

एकरी तीन ते चार क्विंटल सोयाबीन होत आहे. सोयाबीन कापणीला एकरी दोन हजार रुपये मजुरांना द्यावे लागत असून मळणीचा खर्च प्रती पोते २५० रुपये आहे. काढणीचा खर्च उत्पादनाच्या तुलनेत मोठा झाला असल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. रब्बी हंगामावरच आता शेतकऱ्यांची भिस्त दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्याने आता रब्बी पिकांवरच आपले लक्ष केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com